मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha MIDC Fire : वर्ध्यातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Wardha MIDC Fire : वर्ध्यातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 11:08 AM IST

Wardha Fire Incident : वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीत भंगाराच्या गोदामात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Fire Incident In Wardha MIDC
Fire Incident In Wardha MIDC (HT)

Fire Incident In Wardha MIDC : मुंबईतील चर्चगेट येथे घडलेल्या हत्येची घटना ताजी असतानाच आता वर्ध्यातील एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीतील भंगाराच्या गोदामाला आग लागली असून त्यात कोट्यवधींच्या साहित्यांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता स्थानिकांसह पोलिसांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहे. गोदामात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, लाकूड फाट्यांचा मोठा साठा असल्याने आगीने उग्र रुप धारण केलं आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भंगाराच्या गोदामात सकाळी पावणेदहाच्या सुमारास आग लागली. आग कशामुळं लागली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु गोदामातून उंच धुराचे लोट निघाल्याचं दिसून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय पुलगाव येथील सैन्य दलाच्या ताफ्यातून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहे. त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. वाढलेली उष्णता आणि गोदामात लाकडाचा साठा जास्त असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे.

वर्धा एमआयडीसीतील गोदामात काही दिवसांपूर्वीच साहित्यांचा साठा ठेवण्यात आला होता. प्लास्टिकच्या बाटल्या आणि लाकडी फाटे गोदामात ठेवण्यात आल्याने आगीने उग्र रुप धारण केलं आहे. स्थानिकांनी पाण्याचे टँकर घटनास्थळी आणले असून आग विझवण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येत आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान गोदामात दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग विझवण्यात आल्यानंतर परिसराचं जवानांकडून कूलिंग करण्यात येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग