मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील वाडिया रुग्णालयात भीषण आग, अग्निशमनच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल
वाडिया रुग्णालयात भीषण आग
वाडिया रुग्णालयात भीषण आग
05 August 2022, 20:55 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 20:55 IST
  • वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमनच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत.

मुंबई - शहरातील परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बंद ऑपरेशन थिएटरला आज सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमनच्या ८ गाड्या दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीच्या ज्वाळा बाहेरुनही स्पष्ट दिसत आहे. परिसरात धुराचे लोट आकाशात उडत आहेत. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. प्राप्त माहितीनुसार सायंकाळी सातच्या सुमारास आग लागल्याची माहिती पुढे आली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला तत्काळ देण्यात आली.

आग लागल्याची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण किती रुग्ण उपचार घेत होते. आगीदरम्यान रुग्णाचे ऑपरेशन सुरु होते का याबाबत निश्चित माहिती पुढे येऊ शकली नाही. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जीवित हानीचे कोणतेही वृत्त नाही. वाडीया हे प्रसिद्ध रुग्णालय आहे. त्यामुळे मुंबई आणि राज्याच्याही कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपाचर घेण्यासाठी नागरिक येत असतात. अशा रुग्णालयाला आग लागणे म्हणजे धक्कादायक घटना आहे. या ठिकाणी नेहमीच सुरक्षेवर अधिक भर दिला जातो. असे असतानाही आग लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग