मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 24, 2024 11:20 PM IST

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील आज धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांनी तत्काळ छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange patil) यांना तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठी-भेटीसाठी दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली.

अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज धाराशीव जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

धाराधीवमध्ये दौरा करत असताना त्यांना अशक्तपणा आला, त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati sambhajinagarati) येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये (galaxy hospital) दाखल करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. तसेच अशक्तपणा जाणवू लागल्याने तातडीने त्यांना छत्रपती संभाजी नगरला आणण्यात आले. आज मनोज जरांगे पाटीलधाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना येरमाळ्यात त्यांनी जवळपास ४ ते ५ किलोमीटर पायी चालत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयींनी सांगितलं. त्यांना सलाईन लावली आहे.

आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मजोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. जून महिन्याच्या आत जर मराठा आरक्षण मंजूर झाले नाही तर ५ जून पासून उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येवढेच नाही तर नव्या आंदोलनाची घोषणा देखील केली आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी सुद्धा जोरदार करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

 

जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला नवी डेडलाइन दिली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीची आम्ही जोरात तयारी करणार आहोत. जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारणे मार्गी नाही लावला नाही तर ५ जूनपासूनआमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

IPL_Entry_Point