मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather : होळीपूर्वी महाराष्ट्रात पाऊस धारा.. ४ ते ६ मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता

Maharashtra weather : होळीपूर्वी महाराष्ट्रात पाऊस धारा.. ४ ते ६ मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 02, 2023 11:10 PM IST

Maharashtra Rain and temperature : होळीच्या आधी दिवसमहाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.४ मार्च ते ६मार्च या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याची शक्यता आहे.

४ ते ६ मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता
४ ते ६ मार्चदरम्यान राज्यात पावसाची शक्यता

Maharashtra weather forecast : यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा४० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे यावर्षी सरासरीहून अधिक कडक उन्हाळा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उन्हाळा सुरु होण्याच्या आधी राज्यात पावसाची अंट्री होणार आहे. होळीच्या आधी दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ४ मार्च ते ६ मार्च या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याची शक्यता आहे.

मार्च ते मे महिन्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात ४ ते ६ मार्च या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्याचबरोबर हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की, मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात कडक उन्हाळा असणारा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज असून सरासरी तापमान ४० अंशाहून अधिक असण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

IPL_Entry_Point

विभाग