मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanar Refinery: मुख्यमंत्रीपद गेल्याने देवेंद्र फडणवीस भरकटले; नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचा हल्लाबोल

Nanar Refinery: मुख्यमंत्रीपद गेल्याने देवेंद्र फडणवीस भरकटले; नाणार प्रकल्पावरून शिवसेनेचा हल्लाबोल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2023 10:14 AM IST

Saamana Agralekh today: नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Nanar Refinery
Nanar Refinery

Shiv Sena criticized Devendra Fadnavis: भराडी देवीच्या यात्रेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प कोकणात आणणारच असं म्हंटल होते. यावरून शिवसेनेचा मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. फडणवीस हे कोणत्या गुंगीत आहेत? मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे फडणवीस भरकटले आहेत. फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? अशी टीका सामनाच्या आजच्या अग्रलेखातून करण्यात आली.

"फडणवीस हे आंगणेवाडीच्या श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी गेले ते बरेच झाले. भराडी मातेचा इतिहास असे सांगतो की, जे पापी मनाने दर्शनास गेले त्यांना ती चांगलीच अद्दल घडवते व जे सत्कार्य करून गेले त्यांना आशीर्वाद देते. येथे जादूटोणा, जंतर मंतर वगैरे चालत नाही. त्यामुळे श्री. फडणवीस तेथे गेले. माता त्यांना सुबुद्धी देईल. याआधी अनेक नेत्यांनी भराडी देवीकडे राजकीय शक्तिप्रदर्शन करून सत्ता व पैशांची मस्ती दाखविण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांचा कोकणात पराभव झाला", असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

"भराडी देवीच्या दरबारात गद्दार वृत्तीच्या ढोंगी भाविकांना अजिबात मान व स्थान नाही हे समजून घेतले पाहिजे. या वेळी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे राजकीय भालदार, चोपदार असे असंख्य लोक देवीस गेले. तेथे राजकीय सभा घेतल्या. फडणवीस यांनी देवीचे दर्शन घेतल्यावर त्याच्या मेंदूवरील विद्वेषाची जळमटे दूर होतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही, हे चांगले संकेत नाहीत व भविष्यात देवी त्यांना धडा शिकवणार असा हा कौल आहे. जाहीर सभेत फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच शिवसेना व 'ठाकन्या' वर टीका केली. कोकणात रिफायनरी आणणारच असे त्यांनी गर्जून सांजिले फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाया नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? आंगणेवाडीतील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले, "नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची दिशाभूल केली गेली. हा प्रकल्प आणला तर अब येणार नाहीत." असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून कोकणवासीयांना देण्यात आला आहे.

IPL_Entry_Point