मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आज फैसला; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra politics : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आज फैसला; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 10, 2023 06:45 AM IST

Maharashtra Politics Issue In Supreme Court : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा दिवस आहे. हे प्रकरण आता ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Supreme Court
Supreme Court (HT)

Maharashtra Politics Issue In Supreme Court : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा दिवस आहे. हे प्रकरण आता ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा दिवस आहे. हे प्रकरण आता ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरे गटाने ही मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. यावर आज कोर्ट सुनावणी घेणार आहे. या आधी २ न्यायमूर्तींचे व्हँकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग ५ न्यायमूर्तींचे घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर ७ न्यायमूर्तींचं बेंच राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत निर्णय घेऊ शकतं.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील आठपैकी एका मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तीच्या खंड पीठाकडे जावे अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. ही मागणी मान्य झाल्यास राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सत्तासंघर्षातील आठपैकी एका मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तीच्या पीठाकडे जावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी असून ही मागणी मान्य झाल्यास याचे दूरगामी परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहे.

अपात्रतेच्या कारवाईबाबत अधिकाराचा मुद्दा हा या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. पिठासीन अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल असताना त्यांना हा अधिकार आहे की नाही हे पाहने महत्वाचे ठरणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षापूर्वी अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया केस मध्ये २०१६ मध्ये या बाबत कोर्टाने महत्वाचे भाष्य केले होते. हा निकल पाच न्यायमूर्तींच्या पीठाने दिला होता. अरुणाचल प्रदेश मधील आणि महाराष्ट्रातील स्थिती वेगळी असली तरी या मुद्द्यावर अधिक चर्चा व्हावी अशी ठाकरे गटाची इच्छा असून तसा युक्तिवाद देखील करण्यात आला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या ८ प्रमुख मुद्यांपैकी सातव्या मुद्याचे प्रकरण हे सात न्यायमूर्तींच्या पिठाकडे जावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता असून ही सुनावणी अतिशय महत्वाची मानली जात आहे.

आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण क्रमांक दोनला आहे. त्यातच आज निवडणुक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. सत्तासंघर्षाप्रकरणी आज एकाचवेळी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात महत्वाचा दिवस आहे. निवडणूक आयोगात आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर झालेली आहेत. आता प्रत्यक्ष सुनावणीला, युक्तीवादांना सुरुवात कधी होते याचे उत्तर देखील आयोगात मिळणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या