मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena: धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्यास किंवा गोठवल्यास शिंदे गटाकडून ‘या’ चिन्हासाठी प्रयत्न?

Shivsena: धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्यास किंवा गोठवल्यास शिंदे गटाकडून ‘या’ चिन्हासाठी प्रयत्न?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 04, 2022 11:36 PM IST

दोन्ही गटांकडून निवडणूक चिन्हावर दावा सांगितला जात असून यासाठी संघर्ष टोकदार झाला आहे. त्यामुळे आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकते. त्यानंतर शिंदे गटाकडून दुसऱ्या चिन्हासाठी चाचपणी केली जाऊ शकते.

शिंदे गटाकडून‘या’ चिन्हासाठी प्रयत्न?
शिंदे गटाकडून‘या’ चिन्हासाठी प्रयत्न?

मुंबई – शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून पक्षात उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदेना ४० आमदार व १२ खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच व धुनष्यबाणावर आमचाच अधिकार असल्याचे दावा या बंडखोर गटाकडून केला जात आहे.शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे सरकला आहे. खरी शिवसेना कुणाची व धनुष्यबाण (sena group party symbol) कोणाला द्यायचा याचा निर्णय निवडणूक आयोग देणार आहे.

दोन्ही गटांकडून निवडणूक चिन्हावर दावा सांगितला जात असून यासाठी संघर्ष टोकदार झाला आहे. त्यामुळे आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकते.

धनुष्यबाण नेमका कुणाचा या वादात दोन्ही गटाला धक्का बसू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोग चिन्हाबाबतचा निर्णय घेणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तीन नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्याआधीच निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह्याचा निर्णय घेऊ शकतो.

आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदे गट'तलवार' (Sword)या चिन्हासाठी अर्ज करु शकतो. असे संकेत दसरा मेळाव्यातून मिळत आहेत. दसरा मेळावाच्या निमित्ताने शिंदे गटाकडून बीकेसीवर ५१ फूटी तलवारीचे पूजन करण्यात येणार आहे. मात्र निवडणूक चिन्हाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे. या ठिकाणी१००पेक्षा जास्त एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या असून एसटी महामंडळाच्या १८०० बसेस राज्यभरातून मुंबईत येणार आहेत.

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करावा लागू शकतो.

निवडणूक चिन्हाच्या अभावी शिंदे गटाने अंधेरी पोटनिवडणूक न लढल्यास शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगू शकतो. शिंदे गटाकडून भाजपच्या उमेदवाराला समर्थन देण्यात आलं आहे. पण ठाकरे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून देखील अर्ज दाखल केला जावू शकतो.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या