मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra politics: शिवसेना संघर्ष निर्णायक वळणावर.. एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन जाणार दिल्लीला!

Maharashtra politics: शिवसेना संघर्ष निर्णायक वळणावर.. एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन जाणार दिल्लीला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 20, 2022 04:07 PM IST

Maharashtra politics: खरी शिवसेना कुणाची व धनुष्यबाणावर कुणाचा अधिकार याचा निर्णय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शिंदे आपल्यासोबत असलेल्या ४० आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार असल्याचे वृत्त आहे.

एकनाथ शिंदे४०आमदारांना घेऊन जाणार दिल्लीला
एकनाथ शिंदे४०आमदारांना घेऊन जाणार दिल्लीला

Maharashtra politics : एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आव्हान देत पक्षातील ४० आमदार फोडले. त्यानंतर त्यांना घेऊन प्रथम सुरत व त्यानंतर गुवाहाटी गाठली. महाविकास आघाडी सरकारच्या पतनानंतर भाजपच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या अनेक वेळा दिल्ली वाऱ्या झाल्या आहेत.

खरी शिवसेना कुणाची व धनुष्यबाणावर कुणाचा अधिकार याचा निर्णय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शिंदे आपल्यासोबत असलेल्या ४० आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आपल्यासोबत असणाऱ्या ४०आमदारांनाही घेऊन दिल्लीला जाणार आहेत. सर्व आमदारांसाठी महाराष्ट्र सदनामध्ये खोल्याही बुक करण्यात आल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार निवडणूक आयोगाकडे लेखी प्रतिज्ञापत्र सादर करतील की, ते आपल्या मर्जीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. तसेच पक्षातील सर्वाधिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा ते करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ४० आमदार उद्या (बुधवार) दिल्लीत दाखल होणार आहेत. महाराष्ट्र सदनातील बॅक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल त्यासाठी बुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानंतर उद्याच एकनाथ शिंदे आपल्यासोबतच्या आमदारांना घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनातील अनेक रूम बुककरण्यात आल्या आहेत. राज्यातील जवळपास ४० आमदार दिल्लीला जात आहेत. त्याचबरोबर वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने शिंदे सरकारवर खूप टीका झाली. त्यामुळे राज्यातील विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वे मंत्रीआश्विणी वैष्णव आणि केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या