मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा असलेले नरहरी झिरवळ पोहोचले विधानभवनात..
नरहरी झिरवळ
नरहरी झिरवळ
24 June 2022, 16:35 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 16:35 IST
  • मागच्या काही तासांपासून नरहरी झिरवळच नॉट रिचेबल लागत होते. ते कुठे गेलेत? याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. मात्र काही वेळाने ते विधानभवनात दाखल झाल्याने तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला.

मुंबई –शिवसेनेचे नते एकनाथ शिंदे यांनी बंड करून जवळपास ४० शिवसेना आमदार फोडल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूंकप झाला आहे. त्यानंतर १२ बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता विधानसभा उपाध्यक्षच नॉट रिचेबल झाले होते, मात्र सायंकाळच्या सुमारास ते विधानभवनात दाखल झाल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात हळूहळू आमदारांची सख्या ५०च्या आसपास पोहोचली आहे. शिवसेनेचे कट्टर मानले जाणारे दिलीप लांडेही गुवाहाटी येथे शिंदे गटाला मिळाले आहेत. दरम्यान शिवसेनेकडून काही आमदारांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या सगळ्या प्रक्रियेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari zirwal)यांची भूमिका महत्वाची आहे. परंतु मागच्या काही तासांपासून नरहरी झिरवळच नॉट रिचेबल (narhari zirval not reachable) लागत आहे. ते कुठे गेलेत?याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं.

सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाचे १२आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. १२ आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या १२ आमदारांवर कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र आता हा आकडा आणखी वाढला आहे.

 

शिवसेनेने ४६ पानांची याचिका विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. ज्यात एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यातील नमूद ३४ आमदारांवर कारवाई करण्याची ही विनंती केली आहे. संविधानाच्या अनुछेद १० नुसार ही कारवाई करण्याची मागणी केली गेली. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने तात्काळ बैठकीला हजर राहावे असा पक्षाने व्हीप काढला असतानाही बैठकीला गैरहजर राहणाऱ्या ३४ जणांवर कारवाई करण्याची याचिका सेनेने गुरुवारी दिली आहे.

या पाच जणांविरोधात कारवाईची मागणी -

१)सदा सरवणकर

२)प्रकाश आबिटकर

३)संजय रायमुळकर

४)बालाजी किणीकर

५)रमेश बोरनारे