मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray: “हा दिलासा किंवा धक्काही नाही, केवळ..”, SC निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aaditya Thackeray: “हा दिलासा किंवा धक्काही नाही, केवळ..”, SC निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 27, 2022 07:56 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल,असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई-महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी (supreme court decision) झाली. या सुनावणीवेळी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा? धनुष्यबाणावर कोणाचा हक्क यावर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी न्यायालयीन लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात गेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगही निर्णय घेण्यास मोकळा झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून कोर्टात मांडण्यात आली, पण ठाकरे गटाची ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिंदे गटाला दिलासा असल्याचे मानले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा  धक्का नाही तसेच दिलासाही नाही, फक्त युक्तीवादाचं कोर्ट बदललं आहे. सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलं आहे. आमचा लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, आम्ही सत्यासाठी लढत राहणार, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या