मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 26 October 2022 Live Updates Marathi Breaking News

Kishori Pednekar at Sanjay Raut house

Marathi News 26 October 2022 Live: किशोरी पेडणेकर यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट

Marathi News Live Updates : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Wed, 26 Oct 202209:45 AM IST

Kishori Pednekar: माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संजय राऊत हे सध्या पत्रा चाळ कथित घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. 

Wed, 26 Oct 202202:29 AM IST

Ind vs Ndr : पाकिस्तानला हरवल्यानंतर आज भारत नेदरलॅंड्सशी भिडणार

Ind vs Ndr T20 Match 2022 : टी-ट्वेंट्वी विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आज भारतीय संघ नेदरलॅंड्सची भिडणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे.

Wed, 26 Oct 202202:23 AM IST

Cyclone Sitrang: सितरंग चक्रीवादळाचा बांगलादेशला तडाखा, ३५ जणांचा मृत्यू

सितरंग चक्रीवादळाचा बांगलादेशला तडाखा बसला असून आतापर्यंत ३५ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या किनारपट्टीवरील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. दरम्यान, काल दिवसभर बांगलादेशच्या कनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर काही ठिकाणी घरे पडली आहेत.