मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 16 July 2022 Live: सीए परीक्षेचे निकाल जाहीर, मीत शहा देशात पहिला

undefined

Marathi News 16 July 2022 Live: सीए परीक्षेचे निकाल जाहीर, मीत शहा देशात पहिला

03:46 AM ISTJul 16, 2022 09:16 AM Suraj Sadashiv Yadav
  • twitter
  • Share on Facebook

Daily Live News Updates

Sat, 16 Jul 202202:14 AM IST

Maharashtra Rain : राज्यात पावसामुळं मोठी जिवितहानी, मृत्यूंच्या आकड्यानं गाठली शंभरी!

Maharashtra Rain Live Updates : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसानं आतापर्यंत १०२ लोकांचा बळी घेतला आहे. यात चंद्रपूर, पुणे, नाशिक, पालघर, मुंबई आणि कोकणात सर्वात जास्त पाऊस झाला आहे. यामुळं ज्या जिल्ह्यांमध्ये महापूराची स्थिती आहे त्या ठिकाणी एनडीआरएफकडून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलेलं आहे.

<p><strong>Maharashtra Rain Live Updates</strong></p>
Maharashtra Rain Live Updates (HT)

Fri, 15 Jul 202203:32 PM IST

शारजावरून कोच्चीला येणारया विमानात hydrolic failure… सर्व प्रवासी सुखरुप

कोचीला जाणारे एअर अरेबिया फ्लाइट (G9- 426) UAE मधील शारजाह येथून निघाले होते आणि आज संध्याकाळी कोची विमानतळावर उतरत असताना हायड्रोलिक बिघाड झाला. विमान सुरक्षितपणे उतरले. विमानातील सर्व २२२ प्रवासी आणि ७  क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती दिली.

Fri, 15 Jul 202212:35 PM IST

CA Exam Result: सीए परीक्षेचे निकाल जाहीर. मीत शहा देशात पहिला

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउटंण्ट (सीए) परीक्षेत मुंबईच्या मीत शहाने देशात पहिला क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीतचं अभिनंदन केलं आहे.

Fri, 15 Jul 202211:39 AM IST

Uddhav Thackeray: शिवसैनिकांवरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे भायखळा येथील शाखेत

शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या गाडीवर गुरुवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आज भायखळा येथील २०८ नंबरच्या शाखेला भेट दिली. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर ओढावलेली आपबिती कथन केली. हल्ल्यानंतर आमची तक्रारही पोलिसांनी घेतली नाही, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं. त्यावर इथल्या पोलिस ठाण्याचे इनचार्ज कोण आहेत, असं विचारत पोलिसांनी राजकारणात पडू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना केलं.

Fri, 15 Jul 202211:01 AM IST

Sharad Pawar: नागपूरची मानसिकता पुरोगामी, हे शहर अन्यायाविरुद्ध लढण्यास मागे राहणार नाही - शरद पवार

नागपूर जिल्ह्यात सध्या भाजपचं वर्चस्व दिसत असलं तरी येथील लोकांची मानसिकता पुरोगामी आहे. याच शहरात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाचा निर्णय नागपूर शहरातच घेतला. इथला माणूस गरीब असेल पण लाचार नाही. तो एकसंघ झाला तर अन्यायाच्या विरोधात लढून चित्र बदलू शकतो. - शरद पवार

Fri, 15 Jul 202209:25 AM IST

वीर धरण भरले! ६ हजार ११८ क्युसेस वेगाने नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू

पुणे जिल्ह्यातील महत्वाचे धरण असणारे वीर धरण शुक्रवारी ९० टक्के भरले. पुरंदर तालुक्यात असलेले हे धरण पुरंदर, बारामती, इंदापुर तालुक्यासाठी महत्वाचे आहे. नीरा नदिच्या धरण साखळीत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पुरंदर व खंडाळा तालुक्याची सिमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धारण ९० टक्के भरले असून. शुक्रवारी (दि १५) दुपारी २ पासून नीरा नदीपत्रात ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे. शुक्रवारी सकाळी आकरा वाजल्यापासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १,४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता नीरा नदीपत्रात एकून ६ हजार ११८ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Fri, 15 Jul 202207:35 AM IST

Ajit Pawar in Akole: अजित पवार यांनी केली नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन तिथं झालेल्या शेती, पिकं व घरांच्या नुकसानीची पाहणी केली. तसंच अधिकारी वर्गाकडून नुकसान व मदतकार्याचा आढावा घेतला. अकोले तालुक्यातील माणिक ओझर या आदिवासीबहुल गावात घरं पडून झालेल्या नुकसानीचीही त्यांनी माहिती घेतली.

Fri, 15 Jul 202207:35 AM IST

Sri Lanka: रानिल विक्रमासिंघे झाले श्रीलंकेचे कार्यवाहू अध्यक्ष

आर्थिक दिवाळखोरीमुळं अराजक माजलेल्या व अध्यक्ष देशाबाहेर पळून गेल्यामुळं नेतृत्वहीन झालेल्या श्रीलंकेचे कार्यवाहू अध्यक्ष म्हणून आज रानिल विक्रमासिंघे यांनी शपथ घेतली. सरन्यायाधीश जयंता जयसुरिया यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. विक्रमासिंघे हे श्रीलंकेतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यशस्वी होतात का, हे आता पाहावं लागणार आहे.

Fri, 15 Jul 202206:22 AM IST

राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडून कबड्डी दिनाच्या शुभेच्छा

कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे. क्रीडामहर्षींच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कबड्डी दिनाच्या राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Fri, 15 Jul 202205:47 AM IST

Coronavirus:  मागील २४ तासांत देशभरात २० हजारहून अधिक करोना रुग्णांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत २०,०३८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून १६,९९४ रुग्ण बरे झाले आहेत. तर, ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.  सध्या देशभरात १ लाख ९३ हजार ०७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोना संसर्गाचा दर ४.४४ टक्के इतका आहे.

Fri, 15 Jul 202204:30 AM IST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आज घेणार राज ठाकरे यांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यातील बदललेली सत्तासमीकरणे आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Fri, 15 Jul 202203:34 AM IST

Covid 19 Vaccine: देशात आजपासून ७५ दिवस बूस्टर डोस मोफत

देशात १८ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकांना सरकारी लसीकरण केंद्रवर कोविड प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस मोफत मिळणार आहे. ७५ दिवसांसाठी एका विशेष मोहिमेंतर्गत हा बूस्टस डोस आजपासून दिला जाणार आहे.

Fri, 15 Jul 202202:56 AM IST

Maharashtra rain: पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात एकूण १४ एनडीआरएफची आणि ६ एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४ जणांना पावसामुळे प्राण गमावले आहेत. तर १८१ प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. तसंच ७ हजरा ९६३ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

Fri, 15 Jul 202202:23 AM IST

Britain : ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत दुसऱ्या फेरीतही आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीत १०१ मतांसह ते विजयी झाले आहेत. आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ४ उमेदवार उरले आहेत.

Fri, 15 Jul 202202:21 AM IST

Maharashtra Rain: राज्यात पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात आज कोणत्याही जिल्ह्यात रेड अलर्ट नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती आहे. तर रायगड पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.