मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 13 July 2022 Live Updates Marathi Breaking News

Eknath Shinde

Marathi News 13 July 2022 Live: बाळसाहेबांचाच विचार पुढं नेतोय - एकनाथ शिंदे

Daily News Updates

Wed, 13 Jul 202212:15 PM IST

Congress: श्रीलंकेतील परिस्थितीवरून काँग्रेसचा मोदी सरकारला इशारा

श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक व राजकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोदी सरकारला धोक्याचा इशारा दिला आहे. 'महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे वेळीच लक्ष द्या अन्यथा परिस्थिती स्फोटक बनेल. श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची आहे, याकडं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लक्ष वेधलं आहे.

Wed, 13 Jul 202211:38 AM IST

Radhakrishna Vikhe Patil: भाजप उमेदवाराच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं भाजपच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. लोकप्रतिनिधींचंही ऐकावं लागतं हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाला कळलं असेल, असा टोला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला आहे.

Wed, 13 Jul 202207:53 AM IST

Eknath Shinde: बाळासाहेबांचा विचार पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय - एकनाथ शिंदे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक वेगळी भावना असते. बाळासाहेब हे आमच्या गुरुस्थानी होते. त्यांच्या आशीर्वादामुळंच आज माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आज मुख्यमंत्री झाला आहे. त्यांचाच विचार आज मी आणि माझे सहकारी पुढं नेत आहेत. युती सरकार सर्वसामान्य माणसांसाठी काम करेल - एकनाथ शिंदे

Wed, 13 Jul 202207:48 AM IST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक

 गुरुपौर्णमेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाले आहेत. त्यांच्यासोबत संजय शिरसाट, यामिनी जाधव यांच्यासह शिवसेनेचे अन्य बंडखोर आमदारही उपस्थित होते.

Wed, 13 Jul 202207:20 AM IST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल, असं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे गटाला भविष्यात एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागल्यास मनसे हा उत्तम पर्याय आहे. त्या दृष्टीनं देखील ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Wed, 13 Jul 202207:17 AM IST

Sri Lanka: श्रीलंकेत पुन्हा आणबाणी, विक्रमसिंघे कार्यकारी राष्ट्रपती

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून पळून गेल्यानंतर श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर रानिल विक्रमसिंघे हे कार्यकारी राष्ट्रपती बनले आहेत. मात्र, विक्रमासिंघे यांनाही नागरिकांचा विरोध असून ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे.

Wed, 13 Jul 202206:27 AM IST

Sheetal Mhatre: शीतल म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

Wed, 13 Jul 202205:00 AM IST

Sanjay Raut on Gurupurnima: गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं खास ट्वीट

गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एक खास फोटो ट्वीट केलं आहे. त्यात संजय राऊत हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. 'वो ही 'गुरू'... 'गुरूर' भी वो ही! जय महाराष्ट्र!!, असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Wed, 13 Jul 202204:30 AM IST

Covid 19: देशभरात मागील २४ तासांत १६,९०६ करोना बाधितांची नोंद.

देशभरात मागील २४ तासांत १६,९०६ करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, १५,४४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ४५ जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या १,३२,४५७ रुग्णांवर उपचार सुरू असून करोना संसर्गाचा दर ३.६८ टक्के इतका आहे.

Wed, 13 Jul 202204:28 AM IST

उत्तराखंड: दरडी कोसळल्यानं बद्रीनाथ महामार्ग बंद

उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळं बद्रीनाथला जाणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे.

Wed, 13 Jul 202202:28 AM IST

Kolhapur Rain: पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, ५४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आतापर्यंत ५४ बंधारे पाण्याखाली गेले असून सद्या पाणीपातळी ३५.२ फूट इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातली ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट आहे.

Wed, 13 Jul 202202:14 AM IST

Sri Lanka Crisis: महागाईने लंकेची होरपळ, राष्ट्रपती राजपक्षे गेले मालदीवला

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. संतप्त झालेले नागरिक थेट राष्ट्रपती भवनात घुसले होते. यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे तिथून पळून गेले होते. आता ते मालदीवमध्ये गेले असल्याची माहिती समोर येत आहे.

Wed, 13 Jul 202202:11 AM IST

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आता ८ उमेदवार आहेत. साजिद जाविद यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे.