मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 1 November 2022 Live Updates Marathi Breaking News

GST(HT_PRINT)

Marathi News 1 November 2022 Live : जीएसटी संकलानाचा आकडा दीड लाख कोटींच्या पुढे

Marathi News Live Updates : ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली असून या महिन्यात संकलनानं दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Tue, 01 Nov 202209:02 AM IST

GST Collection: जीएसटी संकलनाचा आकडा दीड लाख कोटींच्या पुढे

ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली असून या महिन्यात संकलनानं दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते. 

Tue, 01 Nov 202205:43 AM IST

Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी २९ नोव्हेंबरला; दोन्ही गटांच्या मागणीनंतर न्यायमूर्तींचा निर्णय

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Today Live : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता न्यायमूर्तींच्या पाच सदस्यीय बेंचनं या प्रकरणाची सुनावणी येत्या २९ नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.

Tue, 01 Nov 202205:16 AM IST

Political Crisis : दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर करावेत, न्यायाधीशांचे निर्देश

Maharashtra Political Crisis Hearing Today Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. यावेळी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गट आणि शिवसेनेला कागदपत्रांचा घोषवारा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tue, 01 Nov 202204:27 AM IST

Stock Market: शेअर बाजारात उत्साह, खरेदीचा जोर, सेन्सेक्स वधारला

शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसत असून सेनेक्स ३५० अंकांनी वधारला आहे, तर निफ्टीही १०० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे.

Tue, 01 Nov 202202:27 AM IST

पंतप्रधान आज मोरबीत, रुग्णालयात जखमींची घेणार भेट

गुजरातच्या मोरबीमध्ये केबल ब्रिज दुर्घटनेत १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींना मोरबीतील सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या रुग्णालयात येऊन जखमींची भेट घेणार आहेत.