मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 07 October 2022 Live Updates Marathi Breaking News

Narayan Rane

Marathi News 07 October Live: माझ्या घरापर्यंत येणाऱ्यास मी स्वस्थ झोपू देणार नाही - राणे

Marathi News Live Updates: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Fri, 07 Oct 202210:23 AM IST

Narayan Rane: …तर उद्धव ठाकरेंची सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही - नारायण राणे

भाजपच्या नेत्यांवर यापुढं उद्धव ठाकरेंनी टीका केल्यास त्यांची सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही. सभा घ्यायची असल्यास त्यांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागेल - नारायण राणे

Fri, 07 Oct 202210:13 AM IST

Narayan Rane: माझ्या घरापर्यंत येणाऱ्यास मी स्वस्थ झोपू देणार नाही - राणे

अडीच वर्षांत नारायण राणेंच्या घराची तक्रार केली, एवढंच काम उद्धव ठाकरेंनी केलं. रोज महापालिका आयुक्तांना भेटून राणेचं घर कधी पाडताय? एवढंच विचारायचे. जिवावर उदार होऊन आम्ही शिवसेना वाढवली आणि तुम्ही आमचं घर उद्ध्वस्त करायला निघालास. माझ्या घरापर्यंत येणाऱ्यास मी स्वस्थ झोपू देणार नाही - नारायण राणे

Fri, 07 Oct 202210:13 AM IST

Narayan Rane on Aaditya Thackeray: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव आहे - नारायण राणे

दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचंही नाव आलंय. दिशाला अत्याचार करून मारलं गेलंय, असा आरोप राणे यांनी पुन्हा केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

Fri, 07 Oct 202210:13 AM IST

Narayan Rane on Saamana: करोना काळात दैनिक 'सामना'नं साडे अकरा कोटी नफा कमावला? - राणे

करोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार कोलमडले होते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया डबघाईला आला होता. मात्र, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'नं याच काळात ४२ कोटीचा व्यवसाय केला. त्यात साडेअकरा कोटींचा नफा होता. हा नफा कसा झाला? छगन भुजबळ यांच्या सीएनं हे व्यवहार काळ्याचे पांढरे केले. भुजबळ आत राहून बाहेर आले, आता उद्धव ठाकरेंची बारी आहे - नारायण राणे

Fri, 07 Oct 202210:13 AM IST

Narayan Rane: उद्धव ठाकरे हे एक नंबरचे खोटारडे आणि लबाड आहेत - राणे

उद्धव ठाकरे हे एक नंबरचे खोटारडे आणि लबाड आहेत. मी त्यांना लबाड लांडगा नाव ठेवलंय. मला मारण्यासाठी तुम्ही दिलेल्या सुपाऱ्याही चालल्या नाहीत. मी तुम्हाला पुरून उरेन - नारायण राणे

Fri, 07 Oct 202209:51 AM IST

Narayan Rane: जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम तुम्ही हटवलं का? - राणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणे या राज्यातून त्या राज्यात फिरतात अशी टीका उद्धव ठाकरे करतात. मग जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम उद्धव ठाकरेंनी हटवलं का? - नारायण राणे

Fri, 07 Oct 202209:51 AM IST

Narayan Rane on Shiv Sena Dasara Rally: उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातील वक्त्यांची वैचारिक पातळी काय? - राणे

आमच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी वक्ते गोळा करून आणले होते. त्यांची वैचारिक पातळी काय होती याबद्दल बोलावंसंही वाटत नाही - नारायण राणे

Fri, 07 Oct 202209:47 AM IST

Narayan Rane: हा माणूस आहे कोण? पंतप्रधानांवर टीका करतो?; नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे हे कोण आहेत? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या अध्यक्षांवर टीका करतात. मोठ्या माणसांवर टीका केली की आपण मोठे होतो असं त्यांना वाटतं. पण ह्यांचं काम काय? मुख्यमंत्री म्हणून काय उजेड पाडला? - नारायण राणे

Fri, 07 Oct 202209:47 AM IST

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून आम्हाला प्रेरणा मिळायची. सामाजिक कामाचे धडे मिळायचे. त्यातून आमची जडणघडण झाली. उद्धव ठाकरे यांनी केवळ शिव्या देण्याचं काम केलं. हा तमासगीरांचा मेळावा होता,' अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. 

Fri, 07 Oct 202209:18 AM IST

Nobel Peace Prize: शांततेचे नोबेल जाहीर, रशिया व युक्रेनमधील संघटनांचा गौरव

२०२२ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अॅलेस बिलियात्स्की, मानवी हक्कांसाठी कार्य करणारी रशियातील संघटना ‘मेमोरियल’ आणि युक्रेनमधील मानवी हक्क संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना विभागून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रशिया व युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजेत्यांची नावं महत्त्वाची मानली जात आहेत.

Fri, 07 Oct 202208:25 AM IST

Ladakh Landslide: लडाखमध्ये दरड कोसळून सहा सैनिकांचा मृत्यू

लडाखमध्ये भूस्खलन होऊन भारतीय लष्कराच्या सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली. लडाखमार्गे पुढं जात असलेली लष्कराची तीन वाहनं दरडीखाली अडकली. त्यात सहा जवानांना प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.

Fri, 07 Oct 202204:57 AM IST

Mumbai Rains: मुंबईत काही भागांत पाऊस सुरू

पावसाळा संपला की नाही हेच कळू नये अशी परिस्थिती सध्या आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत हवामान विभागानं यलो अलर्ट दिला असून मुंबईतील काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत.

Fri, 07 Oct 202204:12 AM IST

Stock Market: शेअर बाजारानं फडकवलं लाल निशाण, सेन्सेक्स २५० अंकांनी खाली

मागील दोन दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर बाजारानं आज पुन्हा लाल निशाण फडकवल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला असून निफ्टीही ९० अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.

Fri, 07 Oct 202204:08 AM IST

Arun Bali: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं दीर्घ आजारानं निधन

अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते अरुण बाली यांचं आज निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

Fri, 07 Oct 202202:52 AM IST

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा यलो अलर्ट, चार जिल्हे वगळता सर्वत्र इशारा

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान, आजही संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिलाय.

Fri, 07 Oct 202202:24 AM IST

कर्नाटकात जमावाने जबरदस्तीने मदरशात घुसून केली पूजा; 9 जणांवर गुन्हा दाखल

दसऱ्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात मशिदीत घुसून पूजा केल्याची घटना घडली आहे. मदरशात तोडफोड आणि घोषणाबाजीनंतर एका कोपऱ्यात पुजा करण्यात आली. या प्रकऱणी पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणाला अटक झालेली नाही.

Fri, 07 Oct 202202:21 AM IST

उत्तराखंड हिमस्खलन दुर्घटनेतील १९ जणांचे मृतदेह सापडले, १० जण बेपत्ता

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्यानं अनेकजण बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. गुरुवारी बचावपथकाने १५ मृतदेह बाहेर काढले. तर दुर्घटना घडली त्याचदिवशी चार मृतदेह सापडले होते. अद्याप १० जण बेपत्ता आहेत.