मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gargi Phule Join NCP : निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; विधानसभेपूर्वी हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

Gargi Phule Join NCP : निळू फुलेंच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; विधानसभेपूर्वी हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 30, 2023 01:45 PM IST

Actress Gargi Phule Join NCP : दिवंगत मराठी अभिनेते निळू फुले यांच्या मुलीने बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

Marathi Actress Gargi Phule Join NCP
Marathi Actress Gargi Phule Join NCP (HT)

Marathi Actress Gargi Phule Join NCP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे. याशिवाय मविआतील अनेक नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता दिवंगत मराठी अभिनेते निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले हिने राजकारणात एन्ट्री केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गार्गी फुलेने राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता निळू फुळे यांच्या मुलीने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळं त्याची सोशळ मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना अभिनेत्री गार्गी फुले म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्ष सर्वस्तरावर चांगलं काम करत आहे. विशेषतः महिलांसाठी राष्ट्रवादीने चांगलं काम केल्यामुळं मी राष्ट्रावादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता राष्ट्रवादीकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती मी पार पाडण्यास तयार असल्याचंही गार्गी यांनी म्हटलं आहे. तरुणांनी किनाऱ्यावर न बसता राजकारणात यायला हवं, असं नेहमी म्हटलं जात. त्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचं गार्गी फुले यांनी म्हटलं आहे.

गार्गी फुले या उच्चशिक्षित आहेत, त्यांनी महिला सुरक्षेविषयीच्या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे. १९९८ पासून गार्गी या नाट्य चळवळीत सातत्याने सहभाग घेत आलेल्या आहे. त्यामुळं आता मराठी अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर निळू फुलेंची मुलगी राजकारणातही नशीब आजमावणार आहे. गार्गी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात एन्ट्री केल्यामुळं राष्ट्रवादीकडून त्यांना मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point