मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balu Dhanorkar : तीन खासदार आणि सहा आमदार, टर्म संपण्यापूर्वीच या नेत्यांनी घेतला अखेरचा श्वास

Balu Dhanorkar : तीन खासदार आणि सहा आमदार, टर्म संपण्यापूर्वीच या नेत्यांनी घेतला अखेरचा श्वास

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 30, 2023 01:04 PM IST

Balu Dhanorkar Passes Away : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीत निधन झालं आहे. त्यामुळं आता चंद्रपुरात शोककळा पसरली आहे.

Congress MP Balu Dhanorkar Passes Away
Congress MP Balu Dhanorkar Passes Away (HT)

Congress MP Balu Dhanorkar Passes Away : यंदाच्या लोकसभेची टर्म महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी काही चांगली राहिलेली नाही. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्यानंतर काही महिन्यांपूर्वीच पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आता राज्यातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं किडनीच्या आजाराने निधन झालं आहे. त्यामुळं काँग्रेस आणि भाजपाच्या एकूण तीन खासदारांचं निधन झाल्यामुळं राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकूण सहा आमदारांनी टर्म संपण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला आहे.

पदाचा कालावधी संपण्यापूर्वीच आणि कमी वय असतानाच अनेक लोकप्रतिधींचं निधन होत असल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि बाळू धानोरकर यांचं वय ४७ इतकं होतं. तर भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं वय ७३ इतकं होतं. त्यामुळं कमी वयात राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावत असताना खासदारांची आयुष्यातून अचानक एक्झिट होण्यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे. राजीव सातव यांच्या जागेवरील पोटनिवडणुकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना संधी दिली आहे. त्यानंतर आता पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांत पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (वय ६०), काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (६३), चंद्रकांत जाधव (५७), शिवसेनेचे आमदार रमेश लटके (५२), भाजपचे आमदार मुक्ता टिळक (५७), आणि लक्ष्मण जगताप (६०) यांचंही निधन झालं आहे. त्यामुळं आता वयाची साठी ओलांडण्यापूर्वीच राज्यातील सहा आमदारांचं निधन झालं आहे. निधन झालेल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणुका पार पडल्या आहे.

IPL_Entry_Point