मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोट्याधीशांची सुशिक्षित मुले लादेन, तर पेपर टाकणारे ए. पी. जे. अब्दुल कलाम होतात

कोट्याधीशांची सुशिक्षित मुले लादेन, तर पेपर टाकणारे ए. पी. जे. अब्दुल कलाम होतात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 20, 2022 09:06 PM IST

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले : पुण्यात डॉ. डी. वाय पाटील विद्यालयात पदवीप्रदान सोहळा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 पुणे : कोरोना संकटानंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व अधोरेखीत झाले आहेत. आरोग्य, निरोगीपणा याला आपल्या संस्कृतीत प्राधान्य देण्यात आले आहे. अलकायदातही सुशिक्षित तरुण आहेत तर इन्फोसिस मध्येही सुशिक्षित तरुण आहेत. आजच्या स्थितीचा विचार केल्यास कोट्याधीशाच्या घरात जन्माला आलेला एखादा मुलगा लादेन बदनो, तर लहानपणी जगण्यासाठी पेपर टाकणारा मुलगा ए.पी.जे अब्दुल कलाम बनतो, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी-चिंचवड येथे शुक्रवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. या समारंभात ज्येष्ठ उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदियाही उपस्थित होते.

राजनाथसिंह म्हणाले, अल कायदातही सुशिक्षित तरुण आहेत आणि इन्फोसिसमध्ये देखील सुशिक्षित तरुण आहेत. तुमच्यावरचे संस्कार तुम्ही कोण होणार हे ठरवतो. कोरोना संकटानंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राबद्दलचा जगभरातील आदर कमालीचा वाढला आहे. पदवी घेतल्यानंतर तुम्ही देशात, जगात काम कराल तेव्हा तुमच्या मनाची व्यापकता ठरवेल की तुम्ही लोकांना काय देणार आहात.

करोना काळानंतर भारतीय वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा आदर जगात वाढला. वैद्यकीय क्षेत्रावर कोणाची बळजोरी नव्हती, पण त्यांच्यावरच्या संस्कारांमुळे त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

डॉ. अभय फिरोदिया म्हणाले, महाराष्ट्राची जी प्रगती झाली आहे ती येथील उद्योजकांची देण आहे. १९३१ मध्ये उत्तर प्रदेशचा जीडीपी देशात सर्वाधिक होता. १९६७ मध्ये बिहार राज्य गव्हर्नन्समध्ये देशात आघाडीवर होते. मग आता हे सगळं का बिघडले देशाच्या औद्योगिक प्रगतीचा मी साक्षीदार आहे. काही नव्हते येथे. आता ब्लॉक चेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखे नवी तंत्रज्ञानं येत आहे. या दृष्टीने विद्यापीठांना तयार राहावे लागणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग