मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Jailed Gangster In Karnataka Made Threatening Calls To Nitin Gadkaris Office, Nagpur Police Identifies Calle

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकावणारा गुंड बेळगावातील तुरुंगात; काही तासांत आरोपीचा लावला छडा

Nitin Gadkari Death Threat
Nitin Gadkari Death Threat (MINT_PRINT)
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Jan 15, 2023 08:52 AM IST

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी यांची गंभीर दखल घेतली होती. काही तासांतच आरोपीचा शोध घेण्यात आला आहे. आरोपी हा अट्टल गुंड असून तो बेळगाव येथील तुरुंगात आहे.

नागपूर : भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शनिवारी खळबळ उडाली होती. आरोपींनी नितीन गडकरी यांच्या नागपुरमधील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेची गंभीर दखल नागपूर पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा छडा लावला आहे. आरोपी हा बेळगाव येथील तुरुंगात असून तो अट्टल आरोपी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धमकीवजा फोन करणाऱ्याचे नाव जयेश कांथा असून तो बेळगाव येथील तुरुंगात एका खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. त्याने तुरुंगातूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

नागपूरचे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमक्या दिल्या जात होत्या. फोन करणारा कुख्यात गुंड आणि खुनाचा आरोपी असून त्याचे नाव जयेश कंठा आहे. सध्या हा आरोपी कर्नाटकच्या बेळगाव येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहात बेकायदेशीरपणे फोन वापरून गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकावले.आरोपीची ओळख पातळी असून पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने आरोपींकडून एक डायरी देखील जप्त केली आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या रिमांडची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी आरोपीने तीन वेळा फोन आले होते. गडकरी यांच्याकडे १०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर पोलिसी दलात खळबळ माजली होती. तपासाची चक्रे फिरल्यानंतर समजले की, हा फोन बेळगावमधून आला होता. दरम्यान, या घटनेमुळे नागपूर पोलिसांनी नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल नेटवर्क-नोंदणीकृत क्रमांकावरून गडकरींच्या कार्यालयाच्या लँडलाइन क्रमांकावर सकाळी ११.२५, ११.३२ आणि दुपारी १२.३२ वाजता कार्यालयाला तीन कॉल केले. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) वर तपासले असून त्याचे विश्लेषण करणे सुरू आहे आ. गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मंत्री गडकरींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले.