मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Salim Durani Passes Away: भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

Salim Durani Passes Away: भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 02, 2023 10:49 AM IST

Salim Durani Dies At 88: भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले आहे.

Salim Durani
Salim Durani

Salim Durani Death: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे. अनेक माजी क्रिकेटपटू त्याच्यासोबत घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. सलीम दुर्रानी यांनी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली. आक्रमक फलंदाजीसोबतच ते ऑफ-स्पिन गोलंदाजीही ओळखले जात होते.

ट्रेंडिंग न्यूज

सलीम दुर्राणी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सलीम अझीझ दुर्राणी होते. जन्मानंतर ते भारतात आले. त्याचे वडील अब्दुल अझीझ यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. फाळणीनंतर त्यांचे वडील अब्दुल अझीझ क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कराचीला गेले. तर, सलीम दुर्राणी जामनगरमध्ये आईसोबत राहिले. यानंतर सलीम राजस्थानला गेले.

सन १९६१-६१ मध्ये सलीम दुर्रानी यांनी भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होता. त्यांनी कोलकाता आणि मद्रास कसोटीत अनुक्रमे ८ आणि १० विकेट्स घेऊन भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी अशीच कामगिरी करत भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटी जिंकून दिली. या सामन्यात सलीम दुर्राणीने क्लाइव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स यांना बाद केले. ते चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होता. दरम्यान, १९७३ साली त्यांना कानपूर कसोटीत त्याला संघातून वगळण्यात आले होते, त्यावेळी प्रेक्षकांनी मैदानात ना दुर्राणी, ना कसोटी असा नारा दिला होता.

सलीम दुर्रानी यांनी जानेवारी १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यांनी जवळपास १३ वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले. कसोटीत एक शतक आणि ७ अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी १ हजार २०२ धावा केल्या.त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १०४ धावा होती. याशिवाय, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८ हजार ५४५ धावा केल्या आहेत. सलीम दुर्राणी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४ शतके आणि ४५ अर्धशतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद १३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

WhatsApp channel

विभाग