मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Deshmukh : 'तो' आरोप सिद्ध झाल्यास आमदारकी सोडेन; नितीन देशमुख संतापले!

Nitin Deshmukh : 'तो' आरोप सिद्ध झाल्यास आमदारकी सोडेन; नितीन देशमुख संतापले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 29, 2022 10:40 AM IST

Nitin Deshmukh : माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल नाही तर फडणवीसांनी संबंधित पोलिसांना निलंबित करावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांनी केली आहे.

Nitin Deshmukh vs Eknath Shinde
Nitin Deshmukh vs Eknath Shinde (HT)

Nitin Deshmukh Resignation : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं यावरून राजकारण पेटलेलं असतानाच आता नितीन देशमुखांनी आरोप सिद्ध झाल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी दहा वर्षे जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यामुळं कलम ३५३ चा पोलिसांकडून कशा प्रकारे गैरवापर केला जातो, हे मला चांगलं माहिती आहे. मी नेहमीच पोलिसांचा आदर केलेला आहे. त्यामुळं मी अधिकारी किंवा पोलिसांशी कशाला विनाकारण वाद घालू?, माझ्याकडून पोलिसांना मारहाण किंवा धक्काबुक्की झाल्याचे आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं वक्तव्य आमदार नितीन देशमुखांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या किंवा मंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी आमदारांना परवानगी कशाला हवी?, जेव्हा मुंबईत अधिवेशन असतं तेव्हा मंत्र्यांना भेटण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसते. परंतु नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात आमच्याच विरोधी पक्षनेत्याला भेटण्यासाठी अडवलं जात आहे. आमच्या पक्षप्रमुखांच्या बैठकीसाठी जात असताना अडवणं योग्य नाही. या गैरप्रकाराचा मी निषेध करतो, या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करावी, अशी मागणीही नितीन देशमुखांनी केली आहे.

IPL_Entry_Point