मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tuljapur Accident : तुळजापूरला भीषण अपघातात पाच जागीच ठार; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बसला धडकली कार
अपघातग्रस्त कार
अपघातग्रस्त कार

Tuljapur Accident : तुळजापूरला भीषण अपघातात पाच जागीच ठार; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बसला धडकली कार

04 October 2022, 14:11 ISTNinad Vijayrao Deshmukh

Tuljapur Accident news : तुळजापूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

तुळजापूर : तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात एक कार बसवर जाऊन धडकल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना लातूर-उदगीर मार्गावरील हैबतपूर पेट्रोल पांपाजवळ घडली. यात एक जण जखमी झाला असून त्याला तातडीने दवाखान्यात नेले आहे. हा अपघातात आज सकाळी ९ च्या सुमारास घडला.

ट्रेंडिंग न्यूज

अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख व चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर अशी या भीषण अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर प्रियांका गजानन बनसोडे ही महिला गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृत हे उदगीर येथील रहिवाशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदगीर येथून हे एका कुटुंबातील सहा जण हे सकाळी कारने तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची कार ही लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर आली असता यावेळी एक कुत्रा रस्त्याच्या मध्ये आला. या कुत्र्याला वाचवन्याच्या प्रयत्नात चालवकाने अचानक कार कार वळवली. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका बसला त्यांची गाडी ही समोरा-समोर धडकली. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. तर पाच जण हे जागीच ठार झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने सर्वांना दवाखान्यात भरती करण्यात आले. दरम्यान, पाच जणांचा दवाखान्यात नेन्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर एक महिला जखमी होती. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

विभाग