मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fire News : गोरेगाव आयटी पार्क जवळील जंगलात भीषण आग; मोठ्या क्षेत्रावरील वनसंपत्ती जळून खाक

Fire News : गोरेगाव आयटी पार्क जवळील जंगलात भीषण आग; मोठ्या क्षेत्रावरील वनसंपत्ती जळून खाक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 30, 2022 07:53 AM IST

Goreganon Fire News : गोरेगाव येथील आयटी पार्क जवळील दिंडोशी येथील जंगलात मध्यरात्रीच्या सुमरास भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले.

गोरेगाव येथील जंगलात आग
गोरेगाव येथील जंगलात आग

गोरेगाव : येथील दिंडोशी आयटी पार्कच्या मागील भागातील जंगलात मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या घटनेत मोठ्या क्षेत्रावरील वनसंपत्ती जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

जंगल परिसरात आग लागलीय तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग आहे. जंगलातून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ दिसू लागले होते. त्यामुळे या घटनेची माहिती
मिळाली. या आगीत या परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. घटनेनंतर अग्निशामक दलाचे सात बंब हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या परीसारात बिबट्या, मोर, वानर, हरण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. या परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती देखील आहेत. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? याचा तपास दिंडोशी पोलिस करत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग