मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fire in Mumbai: मुंबईत मालाडमध्ये २१ मजली इमारतीत भीषण आग, नागरिक अडकले

Fire in Mumbai: मुंबईत मालाडमध्ये २१ मजली इमारतीत भीषण आग, नागरिक अडकले

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Dec 03, 2022 01:14 PM IST

Fire in Malad Mumbai: मुंबईत मालाड या उपनगरात जनकल्याण नगर येथील मरिना एन्क्लेव्ह या २१ मजली गगनचुंबी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज, शनिवारी सकाळी मोठी आग लागली.

Malad Fire
Malad Fire

Fire in Malad Mumbai: मुंबईत मालाड या उपनगरात जनकल्याण नगर येथील मरिना एन्क्लेव्ह या २१ मजली गगनचुंबी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज, शनिवारी सकाळी मोठी आग लागली. तिसऱ्या मजल्यावर एका बंद असलेल्या खोलीत ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संपूर्ण मजल्यावर आग लागल्यानंतर मजल्यावरील काही लोक बाल्कनीमध्ये येऊन मदतीसाठी हाका मारता दिसले. स्थानिकांच्या मदतीने आगीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग