मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यात हडपसरमध्ये भीषण अपघात; १ ठार, ३ जण गंभीर जखमी
पुण्यात मिक्सर कंटेनरने वाहनांना उडवले
पुण्यात मिक्सर कंटेनरने वाहनांना उडवले

Pune Accident : पुण्यात हडपसरमध्ये भीषण अपघात; १ ठार, ३ जण गंभीर जखमी

29 September 2022, 10:06 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune Hadapsar Accident : पुण्यातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवल्यानं झालेल्या भीषण अपघातात एक ठार, तर तीन जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Pune Hadapsar Accident : पुण्यातील हडपसर येथे कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवल्यानं झालेल्या भीषण अपघातात १ जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या धडकेनं झाड कोसळून एका नगरिकाच्या अंगावर पडलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हडपसरमधील गाडीतळ येथे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. सध्या क्रेनच्या साह्याने कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. जखमींना रुगालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी हा अपघात झाला. एक कंटेनर हा भरधाव वेगाने येत होता. हडपसर येथील गाडीतळ येथे हा कंटेनर आला असता याच वेळी चुकीच्या बाजूने एक दुचाकी पुढून आली त्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात, मिक्सर कंटेनर चालकाने बाजूला असलेल्या रिक्षावर घातली. मिक्सर कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने मार्गात आलेल्या चार ते पाच रिक्षांना उडवले. यानंतर हा कंटेनर एका झाडाला धडकला. ही धडक एवढी भीषण होती की हे झाड देखील कोसळले. यानंतर मिक्सर कंटेनर हा पलटी झाला. यावेळी एक रिक्षा देखील कंटेनर खाली आल्याने रिक्षाच्या चक्काचूर झाला आहे. या रिक्षात काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात कंटेनर मधील क्लीनर हा मृत्युमुखी पडला आहे. तर ३ नागरिक गंभीर जखमी झाले आहे. मृत्युमुखी आणि जखमींची नवे समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षा मधील तिघांना बाहेर काढले आहे. ते गंभीर असून त्यांना ससुन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा कंटेनर क्रेनच्या साह्याने बाजूला केला जात आहे. दरम्यान या मार्गावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार पहाटे ६ वाजता भरधाव वेगातील एक कंटेनर हा पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी गडीतळ येथे एक दुचाकी चुकीच्या दिशेने आली. तिला वाचवण्याच्या नादात कंटेनर चालकाने आजूबाजूच्या वाहनांना धडक दिली आणि कंटेनर हा पलटी झाला. दरम्यान, या आपघातामुळे वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विभाग