मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रात्रीस खेळ चाले! शिंदे, फडणवीस यांची गुजरातमध्ये गुप्त भेट?
देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदे
25 June 2022, 19:19 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
25 June 2022, 19:19 IST
  • एकनाथ शिंदे काल एकटेच गुजरात येथे निघून गेल्याची चर्चा होती. ते बडोद्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटले असून सत्तास्थापनेची चर्चा केल्याची चर्चा आहे.

Maharashtra political crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे गटाने ५० आमदार असल्याचे सांगत शक्तीप्रदर्शन गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये केले आहे. सत्तास्थापनेसाठी शिंदे गटाकडून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री एकनाथ शिंदे हे एकटेच गुजरात मधील बडोद्यात एका विषेश विमानाने जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्याचे समजत आहे. या भेटीत सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाल्याचे समजत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने परत येण्याचे अनेक आवाहने केली. मात्र, एकनाथ शिंदे हे त्यांच्या मतावर ठाम आहे. गेल्या अडीच वर्षात गळचेपी झाल्याचे कारण देत आम्ही हिंदूत्ववादाशी तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याचे सांगत आपल्या निश्चयावर ठाम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिंदे यांचा परवा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात त्यांनी एक राष्ट्रीय पक्ष सोबत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, भाजप या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे काल तिन दिवसानंतर गुवाहाटी येथील त्यांच्या हॉटेल मधून बाहेर पडले आणि एका विशेष विमानाने ते गुजरात येथील बडोद्यात गेल्याचे समजत आहे. यावेळी भाजपचे नेते तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील बडोद्यात होते. या दोघांची गुपचूप भेट बडोद्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी सत्तासमिकरणाबाबत चर्चा करून एकनाथ शिंदे हे पुन्हा गुवाहाटी येथे परत आले. राज्यात सध्या सुरु असलेल्या तसेच शिवसेना उचलत असलेल्या पावलांवर चर्चा झाली तसेच त्याला काऊंटर करण्यासाठी चर्चा झाली असल्याचेही समजतयं. काल दुपारी शिंदे हे वकिलाच्या टीमलाही भेटण्यासाठी हॉटेल बाहेर दोन तास गेले होते.

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने या बंडामागे भाजपचा हात असल्याचे सांगितले आहे. भाजपने या प्रकारात आपला हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, छुप्या पद्धतीने भाजप बंडखोरांना मदत करत असल्याचे दिसत आहेत. देवेंद्र फडवणीसही पक्ष श्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. त्यांना भेटून ते परत आले आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने पुढील सत्ता स्थापनेसाठी पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.