मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Expansion: एकनाथ शिंदे लढाईत जिंकले मात्र तहात हरले! मलिद्याची खाती BJP कडे

Cabinet Expansion: एकनाथ शिंदे लढाईत जिंकले मात्र तहात हरले! मलिद्याची खाती BJP कडे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 10, 2022 05:41 PM IST

governmentministrydistibution : भाजपने महत्वाची मंत्रालये व विभाग आपल्याकडे ठेवण्याची तयारी केली आहे. म्हटले जाते आहे की, एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना त्याच मंत्रालयाचा पदभार दिला जाईल जी उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी सांभाळली आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाची खाती भाजपकडे राहणार
मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाची खाती भाजपकडे राहणार

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेत बंड करून उद्धव ठाकरे यांच्याशी छेडलेले युद्ध भलेही जिंकले असेल, मात्र भाजपसोबत केलेल्या तहात ते हरल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला होता आणि १८  आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या ९ तर शिंदे गटातील ९ जणांनी शपथ घेतली. तापर्यंत या मंत्र्यांमध्ये खातेवाटप (government ministry distibution) झालेले नाही.  मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने महत्वाची मंत्रालये व विभाग आपल्याकडे ठेवण्याची तयारी केली आहे. म्हटले जाते आहे की, एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना त्याच मंत्रालयाचा पदभार दिला जाईल जी उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी सांभाळली आहेत. त्याचबरोबर महत्वाची मंत्रालये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे जाऊ शकतात. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर भाजप महत्वाच्या मंत्रीपदावर (government ministry distibution) दावा करू शकते. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थमंत्रालय व गृह मंत्रालयाची जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. अशाप्रकार भले ही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, पण गृहमंत्रालयाच्या माध्यमातून ते राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळतील. त्याचबरोबर अर्जमंत्रालय आपल्याकडे ठेवतील. तसेच महसूल, जल संधारण, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग भाजपकडे जाऊ शकतात. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे शहर विकास मंत्रालय, पीडब्ल्यूडी विभाग कायम राहतील. उद्धव सरकारमध्येही त्यांच्याकडे याच विभागांचा पदभार होता. 

एकनाथ शिंदे गटातील उदय सामंत यांना उद्योग तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय मिळू शकते. म्हटले जात आहे, की शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला जितका फायदा व्हायला हवा होता, तितका झाला नाही. दरम्यान एकनाथ शिंदे यांना केवळ ४० आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळाले आहे आणि त्याबदल्यात भाजप महत्वाचे विभाग घेऊ शकते. शिंदे गटातील आमदारांना आपल्या जुन्या विभागांमध्येच काम करावे लागेल. केवळ अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई यांना राज्य मंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे गटाला खालील मंत्रालये मिळू शकतात -

एकनाथ शिंदे गटाला शहरी विकास, सामान्य प्रशासन, कायदा व विधी, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम), कृषि, उद्योग, परिवहन, मराठी भाषा विकास आदि मंत्रालये मिळू शकतात. त्याचबरोबर वन आणि पर्यावरण, पर्यटन, जल पुरवठा आणि स्वच्छता, फलोत्पादन, जल सुरक्षा, उच्च आणि तंत्र शिक्ष सारखे विभागही शिंदे समर्थक आमदारांना मिळू शकतात. 

गृह आणि अर्थ मंत्रालयाबरोबरच खालील विभाग येऊ शकतात भाजपकडे -

भाजपकडे महत्वाचे विभाग राहण्याची चिन्हे आहेत. फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ दोन्ही राहू शकतात. त्याचबरोबर महसूल, ऊर्जा, जल संधारण, घरकूल, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदि विभाग भाजपकडे जाऊ शकतात. 

IPL_Entry_Point