मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  DRI Raid Mumbai : मुंबईत २४ कोटींचे विदेशी सिगारेट्स जप्त, महसूल विभागाची मोठी कारवाई

DRI Raid Mumbai : मुंबईत २४ कोटींचे विदेशी सिगारेट्स जप्त, महसूल विभागाची मोठी कारवाई

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 14, 2023 08:06 PM IST

Cigarettes Smuggling Mumbai : भारतात बंदी घालण्यात आलेल्या विदेशी सिगारेट्सचा मोठा साठा मुंबईत जप्त करण्यात आला आहे.

Cigarettes Smuggling In Mumbai
Cigarettes Smuggling In Mumbai (HT)

Cigarettes Smuggling In Mumbai : भारतात बंदी घालण्यात आलेले घातक विदेशी सिगारेट्सचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईतील न्हावा शेवा बंदरात छापा मारत ही कारवाई केली आहे. डीआरआयने जप्त केलेल्या विदेशी सिगारेट्सची किंमत तब्बल २४ कोटी रुपये असून या घटनेमुळं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खळबळ उडाली आहे. एका कंटेनरमध्ये विदेशी सिगारेट्सचा साठा येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती, त्यानंतर आता तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाच तस्करांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात बंदी घालण्यात आलेल्या सिगारेट्सचा मोठा साठा मुंबईतील न्हावा-शेवा बंदरावर येणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत संशयित कंटेनरवर छापा मारला. कंटेनगरमधील २४ कोटींचे सिगारेट्स जप्त करण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. विदेशातून आणलेले हे सर्व सिगारेट्स मुंबईतील आशिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवण्यात येणार होते. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बंदरावर छापा मारत सर्व साठा जप्त केला आहे.

महाराष्ट्रातील सीमाशूल्क विभागातील अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी तस्करांनी विदेशी सिगारेट्सचा साठा एका कंटेनरमध्ये लादून आणला होता. हा माल कुठून आणण्यात आला आहे, कुठे नेला जात होता, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील पाच तस्करांना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भारतात बंदी घालण्यात आलेल्या विदेशी सिगारेट्सचा साठा जप्त करण्यात आल्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point