मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : बँक खात्यात दोन कोटी पाठवण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिक महिलेला ५७ लाख रुपयांनी गंडवले

Pune Crime : बँक खात्यात दोन कोटी पाठवण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिक महिलेला ५७ लाख रुपयांनी गंडवले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 06, 2022 12:02 PM IST

Pune Crime : पुण्यातील एका ६४ वर्षीय महिलेची त्यांच्या बँक खात्यात परदेशातून दोन कोटी रुपये पाठविण्याच्या बहाण्याने तब्बल ५७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणुक केली आहे.

The cyber crime
The cyber crime (HT_PRINT)

पुणे : वेगवेगळी महागडी गिफ्ट पाठवतो असे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील एका ६४ वर्षीय महिलेची अशाच प्रकारे ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या महिलेशी आरोपींनी ऑनलाइन ओळख करून त्यांच्या बँक खात्यात परदेशातून दोन कोटी रुपये पाठविण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिक महिलेची तब्बल ५७ लाख ७९ हजार रुपयांची फसवणुक केली आहे.

याप्रकरणी दिपा प्रकाश जोशी (वय ६४,रा.आनंदद नगर, पुणे) यांनी सायबर पोलिस ठाण्यात ६ अनोळखी मोबाईल धारक आणि आरबीआय कस्टमर एन्कावयरी नावाच्या ईमेल आयडी धारका विरोधात आर्थिक फसवणुक व आयटी अॅक्ट ६६ सी, ६६ डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा फसवणुकीचा प्रकार ८/१२/२०२१ ते ४/६/२०२२ यादरम्यान घडला.

दिपा जोशी यांच्याशी इरिक ब्राऊन या व्यक्तीने सोशल मिडियाच्या माध्यमातून संर्पक साधला. तो परदेशात काम करत असल्याचा बहाणा करुन त्याने ज्येष्ठ नागरिक महिलेशी मैत्री करुन त्यांना महागडे गिफ्ट पाठविण्याचा बहाणा केला. तसेच त्यांच्या बँक खात्यात दोन कोटी रुपये पाठविण्याचे अमिष दाखवले. आरबीआय बँकेकडून आशा कुमारी या नावाने एका महिलेने बोलत असल्याची बतावणी करुन आरबीआय बँकेच्या मेल आयडीचे सार्धम्य असलेल्या मेल वरुन मेल करत तक्रारदार यांना विविध कारणासाठी धमकी व भिती दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी ५७ लाख ७९ हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणुक केली. महिलेस आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्हयाचा पुढील तपास सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करत आहेत.

डेबीट कार्डची माहिती विचारत पावणे दोन लाखांचा गंडा

पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय श्रीहास रामचंद्र चुनेकर यांना एकाने आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या डेबीट कार्डचा पिन नंबर व डेबीट कार्डच्या मागील बाजुस असणारा सीवीसी नंबर घेऊन त्यांच्या खात्यावरुन पर्सनल लोन घेवून त्यांची एक लाख ८१ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग