मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Metro : मुद्रांक शुल्क दरात कपात करा; क्रेडाई पुणे मेट्रोची राज्य सरकारकडे मागणी
Credai pune metro
Credai pune metro

Pune Metro : मुद्रांक शुल्क दरात कपात करा; क्रेडाई पुणे मेट्रोची राज्य सरकारकडे मागणी

29 March 2023, 23:03 ISTShrikant Ashok Londhe

Credai pune metro : मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय ग्राहक आणि बांधकाम व्यवसायाच्या फायद्याचा आहे. मुद्रांक शुल्क कपात केल्यावर ग्राहकांचे बँकेचे हप्ते आणि कर्जाचा कालावधी देखील कमी होणार आहे.

कोरोना काळात पूर्णपणे ठप्प असलेलेबांधकाम व्यवसाय क्षेत्रआता हळुहळु पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सरकारने याला प्रोत्साहन द्यायला हवे. यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात करावी. पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी असलेले बाजार मूल्य दर (रेडिरेकनर) हे देखील अभ्यास करून तर्कसंगत करावे, अशी विनंती क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आली. याबाबत क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

घर खरेदीदारांची संख्या वाढून त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला देखील होणार आहे,असे फरांदे यांनी सांगितले. मुद्रांक शुल्कात कपातीचा निर्णय ग्राहक आणि बांधकाम व्यवसायाच्या फायद्याचा आहे. मुद्रांक शुल्क कपात केल्यावर ग्राहकांचे बँकेचे हप्ते आणि कर्जाचा कालावधी देखील कमी होणार आहे. कोरोना काळात तत्कालीन सरकारने मुद्रांक शुल्क कमी केले असताना जमा झालेला महसूल पुरेसा बोलका आहे.

 

सध्याचे सात टक्के इतके मुद्रांक शुल्क हे खूप जास्त असून मध्यमवर्गीयांना परवडणारे नाही, क्रेडाईने लक्ष वेधले आहे.

विभाग