मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चोख उत्तर, म्हणाले,'बोलणाऱ्यांनी आधी…'

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चोख उत्तर, म्हणाले,'बोलणाऱ्यांनी आधी…'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 26, 2022 09:27 PM IST

CM Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde
Maharashtra Chief Minister Eknath Shinde (PTI)

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी हजर राहून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला केला. त्यांनी अधिवेशन सोडून दिल्ली येथे गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून त्यांना खोचक टोला लगावला होता. शिंदे हे नवस फेडण्यासाठी दिल्ली वाऱ्या करतात असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत म्हणाले, “माझ्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी मी कोणत्या कार्यक्रमाला चाललो आहे याची माहिती घेतली पाहिजे होती. माझ्यावर कोण टीका करतंय? आज दिल्लीत वीर बाल दिवस होता. गुरुगोविंद सिंगांच्या सहा आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांचं बलिदान झालं. त्यांचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा केला. गुरुगोविंद सिंग, महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नातं असल्याने मला केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला बोलावले होते. खरं म्हणजे माझ्या दिल्ली दौऱ्यावर बोलणारांनी आधी माहिती घेतली पाहिजे होती की, मी दिल्लीला कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहे. त्या मुलांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिले. परंतु आपला स्वाभिमान जाऊ दिला नाही. अशा शौर्याच्या गाथा निर्माण करणाऱ्या मुलांनी आदर्श घालून दिला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सीमा प्रश्नावर बोलतांना शिंदे म्हणाले, “हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. पहिल्यांदाच केंद्रिय गृहमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले. तसेच खटला न्यायालयात आहे, तोपर्यंत कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये याच्या सूचना त्यांनी दिल्या. हा विषय ६० वर्षांचा आहे. यामुळे या खटल्यावर कोणताही परिणाम होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. ती काळजी कर्नाटकनेही घेतली पाहिजे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या