मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Madh Marve Studio: अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार.. १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मढ स्टुडिओला नोटीस

Madh Marve Studio: अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार.. १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मढ स्टुडिओला नोटीस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 26, 2022 09:01 PM IST

मालाडमधील मढ स्टुडिओतील (madh Studio)शूटिंग तात्काळ बंद करावं,त्याचा इतर सर्व वापर बंद करावा,अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिकेने (BMC)जारी केली आहे. यामुळे माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

१००कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी स्टुडिओला नोटीस
१००कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी स्टुडिओला नोटीस

मुंबई : मालाडमधील मढ स्टुडिओतील (madh Studio) शूटिंग तात्काळ बंद करावं, त्याचा इतर सर्व वापर बंद करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिकेने (BMC) जारी केली आहे. ही नोटीस मुंबई महापालिकेने (Bmc notice) स्टुडिओ मालकाला दिली आहे. मढ स्टुडिओ घोटाळ्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

या स्टुडिओला मुंबई महानगर पालिकेने आज नोटीस (Bmc notice) जारी केली आहे. या स्टुडिओतील (Madh Studio) शूटिंग बंद करण्यात यावं, तसेच या स्टुडिओचा इतर कारणांसाठी होणार वापर बंद करावा असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या आदेशाचं पालन केलं नाही तर महापालिका नियमाप्रमाणे उचित कारवाई करेल असंही या आदेशात म्हटलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी आज मढ, मार्वेमधील स्टुडिओजची पाहणी केली. सोमय्या यांनी मढमधील स्टुडिओ प्रकरणी काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यावर तब्बल एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे सोमय्या यांच्या मढमधील पाहणी दौऱ्यानंतर मुंबई महापालिकेने मढ, मार्वे येथील स्टुडिओला नोटीस बजावली आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीचे कागदपत्रे सादर करण्यात आले नसल्यामुळे शूटिंग तातडीने बंद करा, अन्यथा योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशाराच मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे. या नोटीसमध्ये उपायुक्तांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांचा उल्लेख केला आहे. पर्यावरण विभागाकडून परवानगीचे कोणतेही कागदपत्रे सादर करण्यात आलेले नसल्यामुळे आपण तात्काळ शूटिंगसह सर्व कामे बंद करा. अन्यथा महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने मढमधील बालाजी तिरुपती सिनेमाच्या मालकांना नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक उपायुक्तांनी ही नोटीस बजावली आहे. 

भाटी गावच्या परिसरातील भूखंडावर ५७६१ चौ.मी. अर्धपक्का शेड/सेट बनविण्यासाठी  २ मार्च  २०२१ रोजी तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. या परवानगीचे १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले आहे.

स्टुडिओ मालकाकडून पर्यावरण विभागाच्या परवानगीचे कोणतेही कागदपत्रे सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आपण तात्काळ शूटिंगसह सर्व वापर बंद करावा. अन्यथा आपल्यावर महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

IPL_Entry_Point