मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Elections 2022 : हम जहाँ खडे होते है, लाइन वहीं से शुरू होती है; शेलारांची जोरदार डायलॉगबाजी

BMC Elections 2022 : हम जहाँ खडे होते है, लाइन वहीं से शुरू होती है; शेलारांची जोरदार डायलॉगबाजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 20, 2022 03:12 PM IST

Ashish Shelar On Uddhav Thackeray : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात डायलॉगबाजी करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar On Uddhav Thackeray (HT)

Ashish Shelar On Uddhav Thackeray : भाजपनं आता मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे. कारण गेल्या २५ वर्षात मुंबईकरांना शिवसेनेनं केवळ भ्रष्टाचारच दिला असून आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचाच महापौर होणार, असा दावा करत भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईमध्ये भाजपनं कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, त्यात बोलताना शेलारांनी भाषणाची सुरुवातच डायलॉगबाजीनं केली, ते म्हणाले की, 'फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती है', असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

भाजपनं एका व्यक्तीला अध्यक्ष बनवलेलं नाही, पक्षानं एका विचाराला अध्यक्ष बनवलं आहे, मुंबईच्या झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी आणि गणेशभक्तांची पिडा समजून घेण्यासाठी मला मुंबईचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंनी उत्सवप्रेमी मुंबईकरांची अपेक्षा पूर्ण केलेली नाही, गुदमरलेल्या मुंबईत ठेचा खाव्या लागत आहे, सुशिक्षित मराठी माणूस कर भरतोय, पण त्याचा विकास होत नसल्याचं सांगत आशिष शेलारांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजप नेत्यांचं काम दाखवत केलं कौतुक…

मुंबईच्या आतमध्ये प्रवेश करताना ज्या टोलनाक्यांवर भ्रष्टाचार होतो, त्या टोलवरील भ्रष्टाचाराचा बिमोड करणारा खासदार मनोज कोटक मुंबईकरांना हवा आहे, लोकांना घर देण्यासाठी संघर्ष करणारा अतुल भातखळकर मुंबईकरांना हवा आहे, मुंबईतील नद्यांची सेवा करणारी मनिषाताई आता मुंबईकरांना हवीय, असं म्हणत शेलारांनी भाजप नेत्यांच्या कामाचं कौतुक करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

भगवान श्रीकृष्णाचं कर्णानं ऐकलं नाही, देवेंद्ररुपी कृष्णानं एकनाथरुपी कृष्णाला युद्धाबाहेर काढलं आहे, त्यामुळं आता मुंबईत भाजपचा महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेत केलेला भ्रष्टाचार लोकांपर्यंत आम्ही पोहचवणार असून आता मुंबई भाजपच जिंकणार असल्याचा दावाही आशिष शेलारांनी केला आहे.

IPL_Entry_Point