मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajyasabha: सहाव्या जागेवर ‘मविआ’ला जोरदार झटका; भाजपचे धनंजय महाडिक विजयी

Rajyasabha: सहाव्या जागेवर ‘मविआ’ला जोरदार झटका; भाजपचे धनंजय महाडिक विजयी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jun 11, 2022 06:36 AM IST

राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

धनंजय महाडिक
धनंजय महाडिक

राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला. (BJP Candidate Dhananjay Mahadik defeats Shivsena's Sanjay Pawar) महाडिक यांना ४१ मते तर शिवसेनेला मते ३३ मिळाली आहे. संजय पवार यांचा पराभव हा राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा झटका मानला जात आहे.

महाविकास आघाडीचे तीन उमेदवार संजय राऊत (४१ मते), प्रफुल्ल पटेल (४३ मते) आणि इम्रान प्रतापगढी (४४ मते) यांचा पहिल्या फेरीत विजय झाला. तर भाजप उमेदवार पियूष गोयल (४८ मते) आणि अनिल बोंडे (४८ मते) यांचा पहिल्या फेरीत विजय जाहीर करण्यात आला. सहाव्या जागेसाठी मात्र मोठी चुरस निर्माण झाली होती. पहाटे चार वाजता धनंजय महाडिक यांना ४१ मते आणि शिवसेना उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली असल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत ग्राह्य धरण्यात आले नाही. कांदे यांनी मतपत्रिका फोल्ड केली नसल्याने मत बाद करण्यात आले.

लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी निवडणूक लढली: फडणवीस

दरम्यान, भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय जाहीर होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती...जय महाराष्ट्र!’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरात जल्लोष

धनंजय महाडिक यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय घोषित झाल्यानंतर कोल्हापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. धनंजय महाडिक यांना अनेक दिवसांपासून एका विजयाची प्रतीक्षा होती, ती राज्यसभेच्या माध्यमातून मिळाली अशी प्रतिक्रिया महाडीक यांच्या पत्नीने व्यक्त केली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या