मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agnipath: 'अग्निपथ' योजनेअंतर्गत राज्यात लवकरच भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Agnipath: 'अग्निपथ' योजनेअंतर्गत राज्यात लवकरच भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 07, 2022 05:36 PM IST

army recruitment rally केंद्राच्या बहूचर्चीत असलेल्या अग्निवीर योजने अंतर्गत आता राज्यात लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबई सर्कलसाठी ही भरती प्रक्रिया राबवीली जाणार आहे. जाणून घेऊयात कुठल्या पदांसाठी आणि कधी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

Agni veer army recruitment rally Agnipath scheme Army Recruiting office mumbai 20 sep to 10 oct 2022
Agni veer army recruitment rally Agnipath scheme Army Recruiting office mumbai 20 sep to 10 oct 2022

Agnipath scheme केंद्र शासनाच्या अग्निवीर योजनेला देशात अनेक तरुणांनी विरोध केला असला तरी सशस्त्रदले या योजनेद्वारेच भरती प्रक्रिया राबविण्यावर ठाम आहे. या संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. हवाईदला पाठोपाठ लष्करानेही देशात या योजने अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. तर जाणून घेऊयात कुठल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि या साठी लागणारी पात्रतेविषयी.

महाराष्ट्रात होणारी ही भरती प्रक्रिया मुंबई सर्कलसाठी होणार आहे. साधारणता २० सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. ती १० आॅक्टोंबर पर्यंत चालणार आहे. ही भरती प्रक्रिया ठाण्यातील मुंब्रा येथे श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट मैदानावर  पार पडणार आहे. लष्करातील अग्निवीर जनरल ड्यूटी, टेक्नीकल, क्लार्क, टेक्नीकल स्टोअर किपर आणि अग्निवीर ट्रेडस्मन या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या साठी १० वी आणि ८ उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हतता ठेवण्यात आली आहे.

 

या भरती रॅली साठी केवळ मुंबई विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, नंदुरबार आणि धुळे या शहरातील तरुणांना या भरती प्रक्रियेत समाविष्ट होता येणार आहे.

इच्छूक तरुणांना लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in.संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती अंतर्गत शारिरिक चाचणी, मेडिकल चाचणी आणि कॉमन एंटरन्स टेस्ट घेतली जाणार आहे. या सर्व परीक्षातून मेरीट काढून प्रथम आलेल्या तरुणांना अग्निवीर योजने अंतर्गत लष्करात समाविष्ट केले जाणार आहे. ही प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पाडली जाणार असल्याचेही लष्कराने स्पष्ट केले आहे. कॉमन एंटरन्स टेस्ट ही नोंव्हेबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे इच्छूक तरुणांनी लष्कराच्या संकेतस्थळावर आॅनलाईल अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

<p>Agni veer army recruitment rally Agnipath scheme Army Recruiting office mumbai 20 sep to 10 oct 2022</p>
Agni veer army recruitment rally Agnipath scheme Army Recruiting office mumbai 20 sep to 10 oct 2022
IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग