मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramiz Raja: पाकिस्तानचा पराभव जिव्हारी; भारतीय पत्रकारावर भडकले रमीझ राजा, फोन हिसकावून घेत म्हणाले…

Ramiz Raja: पाकिस्तानचा पराभव जिव्हारी; भारतीय पत्रकारावर भडकले रमीझ राजा, फोन हिसकावून घेत म्हणाले…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 12, 2022 12:02 PM IST

Ramiz Raja after Pakistan Defeat in Asia Cup:आशिया कप मधील पराभव पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांना पचनी पडलेला दिसत नाही. मॅच झाल्यावर भारतीय पत्रकावर रागावत त्याचा फोन रमीज राजा यांनी हिसकावून घेतला.

रमीज राजा - सौरभ गांगुली
रमीज राजा - सौरभ गांगुली

Ramiz Raja after Pakistan Defeat in Asia Cup: आशिया कप मधील पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा हे चांगलेच भडकलेले दिसले. त्यांना हा पराभव पचणी न पडल्याचे मैदानात दिसून आले. अंतिम सामन्या दरम्यान राजा हे दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम येथ उपस्थित होते. या सामन्यात पाकिस्तान हारल्याने राजा हे नाराज झाले होते. याच परभवाच्या रागातून रमीज राजा हे एका भारतीय पत्रकारावर भडकले. त्या पत्रकारचा फोन त्यांनी हिसकावून घेतला.

आशिया कपचा अंतिम सामना हा रविवारी दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमयेथे पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान झाला. श्रीलंकेच्या संघाने २३ रनांनी हा सामना जिंकत आशिया कपचे देखील मानकरी ठरले. हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा हे देखील उपस्थित होते. या सोबतच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली हे देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. हा सामना पाकिस्तान हारल्याने रामीज राजा भडकले. त्यांनी पराभवाचा राग हा एका भारतीय पत्रकारावर काढला. या रागाच्या भरात त्यांनी त्या पत्रकाराचा फोन हिसकावून घेतला.

भारतीय पत्रकार रोहित जुगलान यांनी रमीज राजा यांना एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, या पराभावामुळे पाकिस्तानचे फैन्स नाराज आहेत. या प्रश्नावर राजा चांगलेच भडकले. रमीज राजा म्हणाले, 'तुम्ही भारतीय असाल? आमच्या परभवामुळे तुम्ही तर खूश असाल. या नंतर राजा पुढे आले आणि जुगलान यांचा फोन हिसकावून घेतला.

 

भारतीय पत्रकाराने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रित केला असून तो ट्विटरवर अपलोड केला आहे. पाकिस्तानची टीम आशिया कप अंतिम सामन्यात पूर्णत: ऑफ द ट्रॅक दिसली. नाणेफेक जिंकल्यावरही पाकिस्तानच्या संघाचा २३ रनांनी पराभव झाला. श्रीलंकेने ५८ धावा पर्यन्त ५ विकेट गमावल्या होत्या. या नंतर भानुका राजपक्षाने ४५ चेंडूत नॉटआउट ७१ रन काढले. यामुळे श्रीलंकेचा स्कोर हा २० षटकात सहा विकेटवर १७० रनांचे आव्हान पाकिस्तानच्या संघासमोर ठेवेले. मात्र, पाकिस्तानचा संघ २० षटकात १४७ वर काढत बाद झाला. राजपक्षा सामना वीर ठरला. तर वनिंदु हसरंगा मैन ऑफ द सीरीज ठरला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग