मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : तुझ्या मित्राचं लग्न आहे; फूस लावून मध्यप्रदेशात नेलं; पुणे पोलिसांनी सोडवलं

Pune Crime : तुझ्या मित्राचं लग्न आहे; फूस लावून मध्यप्रदेशात नेलं; पुणे पोलिसांनी सोडवलं

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 28, 2023 07:25 AM IST

Pune Crime : पुण्यात एका तरुणीला फूस लावून तिला मध्यप्रदेशांत नेऊन तिचे एका अनोळखी व्यक्तिसोबत लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या तरुणीची सुटका केली आहे.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

पुणे : पुण्यात एका तरुणीला फूस लावून टिळा मध्यप्रदेशांत नेत तिचे लग्न एका अनोळखी पुरुषासोबत लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ' तुझ्या मित्राचं लग्न आहे. त्याने तुला लग्नाला बोलावलं आहे", अशी फूस लावून या अल्पवयीन तरुणीला पळवून नेण्यात आले होते. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

धर्मेश किलेदारसिंग यादव (वय २२. रा. ग्रामग्यारा ता. दतीया मध्यप्रदेश), शांती उर्फ सन्तो हरनाम कुशवाह (वय ४०, रा. गिरीवस ता. लाहोर मध्यप्रदेश) यांना अटक केली असून त्यांच्यावर बाललैंगिक अपराधासह बाल-विवाह प्रतिबंधच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असतांना धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात यांना ही मध्यप्रदेशात असून तिचे एका तरुणाशी लग्न लावून दिले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करत थेट मध्यप्रदेशांत पाठवले. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, पोलीस शिपाई सागर कोंडे, महिला पोलीस शिपाई पूजा लोंढे हे या पथकात होते. त्यांनी मध्यप्रदेश जात ज्या ठिकाणी मुलीला ठेवले होते, तेथून मुलीला ताब्यात घेत तिला पुन्हा सुखरूप पुण्यात आणले. दरम्यान, या मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

बेपत्ता झालेली मुलीची मोठी बहीण ही पुण्यात एक वर्कशॉपमध्ये काम करत होती. ही मुलगी शाळेत जात असताना आपल्या बहिणीला डबा देत असे त्याच ठिकाणी आरोपी महिला हरमान कुशवाह ही सुद्धा काम करत होती. यामुळे त्यांच्यात रोजच गाठी-भेटी होत होत्या. यातूनच आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीसोबत जवळीकता वाढवली आणि विश्वास संपादन केला.

एक दिवस "तुझा मित्र मध्य प्रदेश मध्ये गेला आहे. त्याने तुला त्याच्या लग्नासाठी बोलावलं आहे", अशी फूस लावली आणि मुलीला आरोपीने आपल्यासोबत नेले. मात्र, आरोपी महिलेने आधीच धर्मेंद्र यादव यांच्याशी ५० हजार रुपयात लग्नासाठी मुलगी देण्याचा सौदा केला होता. तो तिने पूर्ण देखील केला आणि या बदल्यात ५० हजार रुपये घेतले. "याबाबतची माहिती कुणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्यात येईल", अशी धमकी देखील अल्पवयीन मुलीला दिली होती. यामुळे पीडित मुलीने कुणाकडेही तक्रार केली नाही.

IPL_Entry_Point

विभाग