मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत; चाचणी यशस्वी

Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत; चाचणी यशस्वी

Mar 27, 2023 09:12 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

Pune Metro test : पुणे मेट्रोची आज रुबी हॉल पर्यन्त यशस्वी चाचणी करण्यात आली. मंगळवार पेठ ते पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच आता मेट्रोद्वारे जोडली जाणार आहे.

पुणे मेट्रोची  सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक मार्गाची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो रुबी हॉल कडे निघाली.  ही रेल्वे ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानकात पोहचली.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

ट्रेनचा वेग १० किमी प्रति तास असा होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून ट्रेन मंगळवार पेठ (RTO) स्थानक येथे मेट्रो पोहोचली. तेथून पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानकात नियोजित वेळेनुसार ही ट्रेन पोहचली. आजच्या चाचणीत मेट्रोने ठरलेली सर्व उद्दिष्ट पार सुरळीत रित्या पार पडली.  
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक - सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक - रुबी हॉल स्थानक  या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली होती.  ही चाचणी झाल्यावर  फुगेवाडी स्थानक  ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर ३१ डिसेंबर  रोजी दुसरी चाचणी घेण्यात आली.  त्यानंतर आज सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक- मंगळवार पेठ (RTO) - पुणे रेल्वे स्थानक - रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी एम आर एस निरीक्षण करण्यासाठी रेलवे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात  येईल आणि लवकरच सी एम आर एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकेवर  मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक,  रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत.  यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत.  यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.  मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होईल. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

मंगळवार पेठ स्थानक (RTO) हे अत्यंत गजबिल्या ठिकाणी आहे.  आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, "आज घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, RTO व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल”.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, "आज घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, RTO व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल”.

WhatsApp channel

इतर गॅलरीज