मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  शारीरिक संबंधानंतर आवश्यक आहे अशा प्रकारची हायजीन, अन्यथा होईल इंफेक्शन

शारीरिक संबंधानंतर आवश्यक आहे अशा प्रकारची हायजीन, अन्यथा होईल इंफेक्शन

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 08, 2023 11:01 PM IST

Sexual Health Tips: लैंगिक संबंधानंतर वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन टाळता येते. सेक्सनंतर पर्सनल हायजीनच्या या गोष्टी लक्षात ठेवा.

लैंगिक आरोग्यासंबंधी टिप्स
लैंगिक आरोग्यासंबंधी टिप्स (pexels)

Intimate Hygiene After Sex: प्रत्येकाला पर्सनल हायजीनबद्दल म्हणजे स्वतःच्या शरीराच्या स्वच्छतेबद्दल माहिती आहे. पण सेक्स नंतर स्वच्छता कशी राखायची, याबाबत बहुतेक लोकांना खूप कमी माहिती असते. आणि मुख्य म्हणजे त्यांना याबद्दल जाणून घ्यायचे देखील नसते. पुरुषांबरोबरच महिलांनाही स्वच्छतेचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे युरिन इन्फेक्शन टाळता येईल. सेक्स केल्यानंतर स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर खाज किंवा एलर्जी होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

सेक्सनंतर यूरिन पास करणे महत्त्वाचे

सेक्सनंतर बाथरूमला जाणे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. अनेकदा महिलांना असे वाटते की शारीरिक संबंधानंतर यूरिन पास गर्भधारणेची शक्यता कमी होते. परंतु यूरिनला जाण्याचा संबंध म्हणजे यूटीआय टाळणे. यूरिन पास केल्याने योनी मार्गात संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. मात्र याबाबत संशोधन पूर्ण झालेले नाही. परंतु महिलांच्या शरीराच्या रचनेमुळे युरिन इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत यूरिन केल्याने योनीतून कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया बाहेर पडण्याची शक्यता वाढते.

इंटीमेट एरियाची स्वच्छता आवश्यक

शारीरिक संबंध केल्यानंतर इंटीमेट एरिया स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला फक्त स्वच्छ पाणी आणि माइल्ड साबण आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही स्वतःला स्वच्छ करू शकता.

हात धुणे आवश्यक

इंटीमेट झाल्यानंतर हात स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी आणि साबणाने हात चांगले धुवा. जेणेकरून कोणतेही बॅक्टेरिया राहणार नाहीत.

ओरल सेक्सनंतर माउथवॉश आवश्यक

इंटीमेट होण्यासाठी जर तुम्ही इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास, तोंडाची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माउथवॉश वापरा. तसेच ब्रश करायला विसरू नका. अन्यथा बॅक्टेरिया संपूर्ण शरीरात पसरू शकतात.

या आजारांना धोका असतो

जर तुम्ही फिजिकल रिलेशननंतर स्वच्छतेची योग्य काळजी घेतली नाही तर युरिन इन्फेक्शन आणि बॅक्टेरिया पसरण्याची दाट शक्यता असते. तसेच एसआयटी सारखे आजार देखील पसरू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग