मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Detox: शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी डायटमध्ये घ्या हे फूड्स

Body Detox: शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी डायटमध्ये घ्या हे फूड्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 23, 2023 08:05 PM IST

Healthy Food: अनेक वेळा आपण काय खात आहोत याकडे आपण लक्ष देत नाही. त्यामुळे शरीर डिटॉक्स करणे गरजेचे असते. त्यासाठी काय करावे जाणून घ्या.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी फूड
शरीर डिटॉक्स करण्यासाठी फूड

Body Detox Food: धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ शकत नाही. भूक लागल्यावर काहीही चुकीचे खातो, ज्यामुळे पचनशक्तीवर परिणाम तर होतोच पण लठ्ठपणाही वाढतो आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. खराब अन्नामुळे चेहऱ्यावरील त्वचेची चमक कमी होते. पिंपल्स आणि एक्ने दिसतात. शरीर आतून स्वच्छ करणे आवश्यक आहे म्हणजेच डिटॉक्स करणे. डिटॉक्स करणे म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे. जर तुम्हाला शरीर आतून स्वच्छ करायचे असेल तर या पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करा.

ट्रेंडिंग न्यूज

लिंबू

लिंबू बॉडी डिटॉक्ससाठी सर्वोत्तम मानले जाते. व्हिटॅमिन सी आणि अँटि ऑक्सिडंट्सने समृद्ध, लिंबू सहजपणे विषारी पदार्थ बाहेर टाकते. दररोज लिंबूपाणी प्यायल्याने शरीर सहज डिटॉक्स होते.

आले

हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. त्याच वेळी शरीर डिटॉक्स देखील होते. आयुर्वेदात आल्याला औषध मानले जाते. तुमच्या पोटात गॅस होत असेल किंवा फुगवटा असेल तर आल्याचा चहा प्या.

कोबी

चायनीज फूडमध्ये लोकांना कोबीची पाने खायला आवडतात. कोबी चवीसोबतच वजन कमी करण्यास मदत करते. हे डिटॉक्स फूड आहे. जे खाल्ल्याने शरीर आतून स्वच्छ होते.

ब्राऊन राइस

सामान्यतः वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राइस खाल्ले जातात. पण ब्राउन राइस हे देखील डिटॉक्स फूड आहे. पौष्टिकतेने युक्त ब्राऊन राइस खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि पोटही साफ होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग