मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय? ते मुलांना कसे हानी पोहोचवते? जाणून घ्या

हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय? ते मुलांना कसे हानी पोहोचवते? जाणून घ्या

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 07, 2023 09:30 PM IST

Parenting Tips: तुमच्या मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी किंवा त्यांना जीवनातील निराशेपासून वाचवण्यासाठी तुम्ही प्रत्येक निर्णय स्वतः घेण्यावर विश्वास ठेवता का? असे करू नका. याचा तुमच्या मुलांवर वाईट परिणाम होतो.

हायपर पॅरेंटिंग
हायपर पॅरेंटिंग

Harmful effects of Hyper Parenting on Kids: जर तुमची देखील अशा पालकांच्या यादीत गणना केली जाते, जे आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावर चालण्यापासून रोखण्यासाठी किंवा त्यांना जीवनातील निराशेपासून वाचवण्यासाठी स्वतःच निर्णय घेण्यावर विश्वास ठेवता, तर असे करुन तुम्ही तुमच्या मुलाला मदत करत नाही तर तुम्ही तुमच्या मुलासाठी चुकीचे करत आहात. या प्रकारच्या पालकांच्या वर्तनाला हायपर पॅरेंटिंग म्हणून ओळखले जाते. हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय आणि यामुळे मुलांचे काय नुकसान होते, ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय?

काही पालक त्यांच्या मुलांबद्दल अती पझेसिव्ह असतात. प्रत्येक छोट्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून त्यांना त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक भागावर नियंत्रण ठेवायचे असते. अशा प्रकारचे पालकत्व ज्यामध्ये मुलाला जास्त प्रमाणात नियंत्रित किंवा मार्गदर्शन केले जाते, त्याला हायपर पॅरेंटिंग किंवा हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात.

हायपर पॅरेंटिंगचे तोटे

आत्मविश्वासाचा अभाव - मुलांना प्रत्येक गोष्टीत मदत केल्याने त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. अशी मुले घराबाहेर किंवा शाळेत एकट्याने कोणतेही काम करण्यास घाबरतात.

विचार करण्याची क्षमता कमकुवत होते - पालकांनी प्रत्येक कामात मदत करून मुलाची विचारशक्ती कमकुवत करू नये.

पालकांशी भांडण होऊ शकते - काही वेळा हायपर पॅरेंटिंगमुळे मुले पालकांना आपले शत्रू मानू लागतात. त्यांना असे वाटते की पालक सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतात, त्यांना काहीही करण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे मुलं पालकांपासून दूर पळू लागतात आणि काही वेळा त्यांच्यापासून गोष्टी लपवतात.

स्वातंत्र्याच्या अभावामुळे गुंडगिरीचे बळी - प्रत्येक गोष्टीवर पालकांच्या नियंत्रणामुळे, मुले लाजाळू होऊ शकतात. जे इतरांच्या कमेंटने सहजपणे दुखावतात.

रोगांचे बळी - मूल बाहेर उद्यानात खेळायला गेले तर त्यांच्या स्वच्छतेची काळजी, इतर मुलांसोबत धुळीत खेळताना जंतूंच्या संपर्कात येण्याचा ताण ही अशा पालकांची काही लक्षणे आहेत. पण अशी मुलं जी सतत स्वच्छ वातावरणात राहतात, ती आजारांना लवकर बळी पडतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग