Joke of the day : बंड्या जेव्हा शाळेत उशिरा येण्याचं कारण सांगतो…
Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!
Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
ट्रेंडिंग न्यूज
बंड्या जेव्हा शाळेत उशिरा येण्याचं कारण सांगतो…
गुरुजी : उशिरा का आलास?
बंड्या : रस्त्यावरच्या बोर्डामुळे.
गुरुजी : बोर्डामुळे? कसला बोर्ड? काय होतं त्यावर?
बंड्या : त्या बोर्डावर लिहिलं होतं, ‘शाळा पुढे आहे, कृपया सावकाश चला’!
गुरुजींनी बंड्याला सावकाश हाणला…
...
पोलीस : चल भाऊ, तुझी फाशीची वेळ झाली आहे.
कैदी : पण मला १० दिवसांनी फाशी होणार होती?
पोलीस हवालदार : जेलर साहेब म्हणाले, तू त्यांच्या गावचा आहेस. तुझं काम सर्वात आधी व्हायला पाहिजे.
(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
विभाग