मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : कोंबडी आधी की अंडं? बंड्याचं उत्तर ऐका!

Joke of the day : कोंबडी आधी की अंडं? बंड्याचं उत्तर ऐका!

HT Marathi Desk HT Marathi
May 30, 2023 09:35 AM IST

Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Jokes
Viral Jokes

Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बायकोनं मोबाइलचं नवीन सिम विकत घेतलं आणि नवऱ्याला सरप्राइज द्यायचं ठरवलं. किचनमध्ये जाऊन तिनं नवऱ्याला फोन लावला…

बायको : हॅलो डार्लिंग

नवरा : (हळूच) तू नंतर फोन कर. चेटकीण किचनमध्येच आहे.

नवऱ्याचे काय हाल झाले असतील सांगायला पाहिजे का?

बंड्या आणि पप्पू गप्पा मारत असतात…

पप्पू : बंड्या सांग बघू, आधी काय आलं… अंडं की कोंबडी?

बंड्या : आधी चाकना आला, मग अंडी, मग चिकन आलं, मग १ बिअर आणि पाण्याची बाटली. सगळ्यात शेवटी बिल आलं…

पप्पूनं बंड्याचे पाय धरले…

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel

विभाग