मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Special Drink: कडक उन्हाळ्यात थंडावा देईल मसाला ताकाची ही रेसिपी, दिवसभर राहिल कूलनेस

Summer Special Drink: कडक उन्हाळ्यात थंडावा देईल मसाला ताकाची ही रेसिपी, दिवसभर राहिल कूलनेस

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 18, 2023 01:02 PM IST

Buttermilk for Coolness: उन्हाळ्यात सतत काहीतरी थंड प्यायची इच्छा होत असते. अशावेळी कोल्ड ड्रिंक पिण्याऐवजी तुम्ही ताक घेऊ शकता. शरीराला थंडावा देण्यासाठी मसाला ताकाची ही रेसिपी ट्राय करा.

मसाला ताक
मसाला ताक (HT)

Masala Buttermilk Recipe: कडक उन्हात एक ग्लास थंड ताक प्यायला मिळाले, तर दिवसभर गारवा मिळतो. ताक केवळ उष्णतेपासून बचाव करत नाही तर आरोग्यासाठी अनेक असंख्य फायदे देखील देते. हे घेतल्याने रक्तदाब तर नियंत्रित राहतोच, पण पचनक्रियाही व्यवस्थित चालते. तर वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कसे बनवावे जाते थंड-थंड मसाला ताक.

- १ टेबल स्पून कोथिंबीर (बारीक चिरलेले)

- २ टी स्पून हिरवी मिरची (बारीत चिरलेली)

- १ टेबल स्पून मीठ

- २ टेबल स्पून काळे मीठ

- अर्धा कप पाणी

- चाट मसाला

Dum Aloo Recipe: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा बटाट्याची ही भाजी, सगळे खातील आवडीने

मसाला ताक बनवण्याची पद्धत

मसाला ताक बनवण्यासाठी एका बाऊल मध्ये दही घ्या. त्यात मीठ आणि काळे मीठ टाकून चांगले फेटून घ्या. आता त्यात कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करा. आता यात पाणी टाकून ते ब्लेंडर मध्ये चांगले फिरवून घ्या. हे सर्व नीट ब्लेंड करा म्हणजे ताक चांगले तयार होईल. आता हे एका ग्लास मध्ये काढून घ्या. वरून चिमुटभर चाट मसाला आणि कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा. तुम्हाला थंड प्यायला आवडत असेल तर तुम्ही हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता. किंवा एक किंवा २ बर्फाचे तुकडे सुद्धा यात टाकू शकता. दिवसभरात तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे देसी ड्रिंक पिऊ शकता.

WhatsApp channel

विभाग