मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diabetes Care: मधुमेही रुग्णांनी या फूड्सनी करावी दिवसाची सुरूवात, दिवसभर नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

Diabetes Care: मधुमेही रुग्णांनी या फूड्सनी करावी दिवसाची सुरूवात, दिवसभर नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 21, 2023 10:51 AM IST

Breakfast for Diabetic Patients: मधुमेहाच्या रुग्णांसाठी खाण्यापिण्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत योग्य नाश्ता करणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि दिवसभर ऊर्जा राहते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फूड्स
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फूड्स (unsplash)

Foods For Control Blood Sugar: मधुमेह हा असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी उपचार नाही. आहार आणि योग्य जीवनशैलीनेच मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. शुगरचा त्रास असल्यावर खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण असे बरेच पदार्थ आहेत जे रक्तातील साखरेची पातळी खराब करतात. अशा स्थितीत रुग्णाच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की, सकाळी कोणत्या पदार्थांनी दिवसाची सुरुवात करावी, जेणेकरून दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहिल आणि त्याच वेळी पोट भरलेले राहिल. तुमचाही अनेकदा नाश्त्याबाबत गोंधळ होत असेल, तर तुम्ही या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

जवसासह फ्रूट स्मूदी

मधुमेहाच्या रुग्णांना सर्व फळे खाणे शक्य नसते. डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:साठी फळे निवडा. या फळांपासून तुम्ही स्मूदी बनवू शकता. तसेच त्यात जवसाच्या बिया टाका. जेणेकरून तुमचे पोट भरलेले राहते आणि दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

नाचणीपासून बनवा नाश्ता

नाचणी अतिशय पौष्टिक आहे. तसेच मधुमेही रुग्ण हे सहज खाऊ शकतात. दिवसाची सुरुवात करण्यासाठी रागी वापरता येते. रागी उत्तपम किंवा रोटी नाश्त्यात खाऊ शकता.

बेसनाचा नाश्ता

तुम्ही नाश्त्यामध्ये बेसनाचे पॅनकेक म्हणजे धिरडे खाऊ शकता. चणा डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. तसेच यामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत तुम्ही ते सकाळी सहज खाऊ शकता. दिवसभर रक्तातील साखर ठीक राहील आणि ऊर्जाही राहील.

मेथीचे पराठे

मेथीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह मुबलक प्रमाणात असतात. त्याच वेळी कार्बोहायड्रेट्स खूप कमी प्रमाणात असतात. बेसनाच्या पीठात मेथीची पाने मिक्स करुन पराठे बनवा. सकाळी आरामात खाऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा उत्तम नाश्ता आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग