मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Morning: महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी करा दिवसाची सुरुवात

Good Morning: महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी करा दिवसाची सुरुवात

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2022 08:50 AM IST

Mahaparinirvan Diwas Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या प्रियजनांना पाठून त्यांना प्रेरणा द्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. त्यांच्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. म्हणूनच आम्ही आज तुमच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार शेअर करत आहोत. हे विचार तुम्ही कुटुंबीयांना, प्रियजनांना, मित्रांना पाठवू शकता.

१) शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

-डॉ बाबासाहेब आंबेडकर

 

२) बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

-डॉ बाबासाहेब आंबेडकर

 

३) अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद

आपल्यात येण्यासाठी आपण

स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

शुभ सकाळ!!

 

४) माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.

-डॉ बाबासाहेब आंबेडकर

 

५) अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

- डॉ बाबासाहेब आंबेडकर

 

६) तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा

तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात

हे अधिक महत्वाचे आहे.

-डॉ बाबासाहेब आंबेडकर

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या