मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Care: नवजात बाळांचे केस विंचरण्याचे हे अनेक फायदे, हेअर ब्रश वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

Baby Care: नवजात बाळांचे केस विंचरण्याचे हे अनेक फायदे, हेअर ब्रश वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2023 11:14 PM IST

Parenting Tips: नवजात बाळाचे केस विंचरणे खरंच योग्य आहे का? लहान मुलांच्या केस विंचरण्याबद्दल हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा उपस्थित होत असेल तर जाणून घ्या, नवजात बाळाचे केस विंचरण्यामुळे काय फायदे होतात.

नवजात बाळाचे केस विंचरण्याचे फायदे आणि घ्यावयाची काळजी
नवजात बाळाचे केस विंचरण्याचे फायदे आणि घ्यावयाची काळजी

Precautions to Use Hair Brush for Baby: नवजात बाळाचा जन्म होताच त्याच्या संगोपनाशी संबंधित अनेक प्रश्न पालकांच्या मनाला सतावू लागतात. अशा काही प्रश्नांपैकी एक प्रश्न असतो बाळाचे केस विंचरण्याबद्दल नवीन आई घरातील मोठ्या व्यक्तींना विचारताना दिसते. प्रश्न असा आहे की, नवजात बाळाचे केस विंचरणे खरोखरच योग्य आहे का? लहान मुलांच्या डोक्यावर कंगवा फिरवणे हा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा उपस्थित होत असेल तर जाणून घ्या, नवजात बाळाचे केस विंचरण्याचे अनेक फायदे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नवजात बाळाचे केस विंचरण्याचे फायदे

चांगली झोप

मुलांचे केस विंचरल्याने किंवा ब्रश केल्याने त्यांना खूप आराम मिळतो. खरं तर, जेव्हा आपण मुलांच्या केसांना हलके ब्रश किंवा कंगवा करता तेव्हा यामुळे टाळूचा रक्त प्रवाह देखील सुधारतो, ज्यामुळे बाळाला रिलॅक्स राहण्यास फायदा होतो. असे नियमित केल्याने त्याला चांगली झोप येते.

केसांची वाढ

बेबी ब्रशच्या साहाय्याने मऊ ब्रिस्टलने मुलांचे केस विंचरल्याने रक्तप्रवाह सुधारतो. ज्यामुळे केसांच्या वाढीत फायदा होतो.

ग्रूमिंग

मुलांच्या टाळूला रोज कोंबिंग केल्याने त्यांना ग्रूमिंगमध्ये फायदा होतो. मुलांचे केस विंचरुन तुम्ही त्यांना चांगला लूक देऊ शकता.

क्रॅडल क्रॅपची समस्या दूर होते

नवजात बालकांचे केस हलकेच ब्रश केल्याने त्यांना क्रॅडल क्रॅपच्या समस्येत मदत होते. क्रॅडल क्रॅप ही मुलांच्या टाळूवर एक समस्या आहे, ज्यामध्ये त्यांच्या टाळूवर चट्टे आणि कोरडेपणा येतो. परंतु जेव्हा तुम्ही दररोज बाळाच्या केसांना व्यवस्थित कंगवा फिरवता तेव्हा ते टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

बाळांना हेअर ब्रश वापरताना लक्षात ठेवा या गोष्टी

नवजात बाळाला हेअर ब्रश वापरताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की नवजात मुलांचे केस किंवा टाळू खूप नाजूक असतात. कंगवा करताना मुलांच्या टाळूवर जास्त दाब देऊ नका. याशिवाय ब्रश करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही सॉफ्ट ब्रिस्टल हेअर ब्रश वापरत आहात. कंगवा फिरवताना केस गुंतत असतील तर तुम्ही यासाठी हेअर सीरम किंवा तेल वापरू शकता. तुमच्या मुलाच्या टाळूवर काही समस्या असल्यास, ब्रश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel