मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  International Tea Day: ब्लड प्रेशर पासून हृदयाचे आरोग्य राखण्यापर्यंत मदत करतो ब्लॅक टी, होतात हे फायदे

International Tea Day: ब्लड प्रेशर पासून हृदयाचे आरोग्य राखण्यापर्यंत मदत करतो ब्लॅक टी, होतात हे फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 21, 2023 07:18 PM IST

Black Tea Benefits: भारतासह जगभरात २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. ग्रीन टी आणि अनेक प्रकारचे हर्बल टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ब्लॅक टीमुळे सुद्धा आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

ब्लॅक टी पिण्याचे फायदे
ब्लॅक टी पिण्याचे फायदे

Amazing Health Benefits of Drinking Black Tea: पाण्यानंतर जगातील सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय म्हणजे ब्लॅक टी. आंतरराष्ट्रीय चहा दिनाची सुरुवात केवळ चहाची अनोखी चव साजरी करण्यासाठी करण्यात आली. जो भारताबरोबरच इतर देशांमध्येही साजरा केला जातो. हा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आम्ही येथे ब्लॅक टीबद्दल बोलत आहोत, जे पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कॅमेलिया सायनेन्सिसच्या झाडापासून काळा चहा येतो. ज्यामध्ये कॅफिनचे प्रमाण बाकीच्या चहापेक्षा जास्त असते. त्यात कॉफीपेक्षा कमी प्रमाणात कॅफिन असते.

अँटी ऑक्सिडंट्सनेयुक्त

ब्लॅक टी प्यायल्याने शरीराला भरपूर अँटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. त्यामुळे जुनाट आजार होण्याचा धोका कमी होतो. ब्लॅक टी प्यायल्याने फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते आणि पेशींचे नुकसान कमी होते. जे त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. ब्लॅक टीमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट्स कॅटेचिन, थेफ्लाव्हिन्स यांसारखे अँटी ऑक्सिडंट्स असतात, ज्याचा एकूण आरोग्याला फायदा होतो.

हृदय निरोगी ठेवते

ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स अँटी- ऑक्सिडेंट असतात जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. दररोज ब्लॅक टी प्यायल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करा

जेव्हा शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा ब्लॅक टी पिणे फायदेशीर ठरते. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. खराब कोलेस्टेरॉलमुळे अनेक वेळा हार्ट स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर होण्याचा धोका असतो. ब्लॅक टी हे सर्व धोके कमी करण्याचे काम करते.

उच्च रक्तदाबात आराम

उच्च रक्तदाबामुळे केवळ हृदयच नाही तर किडनी निकामी होणे, पक्षाघात, दृष्टी कमकुवत होते. म्हणूनच उच्च रक्तदाब नियंत्रित करणे महत्वाचे आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज एक कप ब्लॅक टी प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी होण्यास मदत होते. विशेषत: ज्या रुग्णांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी आहेत, त्यांनी काळा चहा प्यायल्याने फायदा होतो.

पोटासाठीही फायदेशीर

अभ्यासात असे आढळून आले आहे की ब्लॅक टीमुळे आतड्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. पॉलिफेनॉलच्या मदतीने, काळ्या चहामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास आणि खराब बॅक्टेरिया कमी करण्यास मदत होते. ब्लॅक टीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात जे हानिकारक घटकांना मारतात आणि आतड्यांतील बॅक्टेरिया योग्य पचन राखण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel