मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Water Rich Food: उन्हाळ्यात राहायचंय कूल आणि हायड्रेटेड? आहारात घ्या हे पदार्थ

Water Rich Food: उन्हाळ्यात राहायचंय कूल आणि हायड्रेटेड? आहारात घ्या हे पदार्थ

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 21, 2023 02:13 PM IST

Hydrating Foods for Summer: उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ नये यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. शरीर थंड आणि हाडड्रेटेड ठेवण्यासाठी हे पदार्थ घ्या.

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी आहारात
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी आहारात

Water Rich Food to Keep Body Cool and Hydrated in Summer: उन्हाळा सुरू झाला की डिहायड्रेशनची समस्या त्रास देऊ लागते. हा असा सीझन असतो ज्यात खाण्या-पिण्यात थोडासा जरी हलगर्जीपणा केला तरी त्याचा लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात लोक पाण्याने युक्त पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करण्यावर भर देतात. तुम्हाला पण उन्हाळ्यात कूल आणि हायड्रेट राहायचं असेल तर या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करायला विसरू नका.

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू खाणे खूप फायदेशीर मानले जाते. लिंबू पाणी पिल्याने गरमीपासून सुटका होते आणि उष्माघातापासून देखील संरक्षण होते. एवढेच नाही तर आतून ताजेतवाने देखील होते.

लस्सी

पोटातील गरमी दूर करण्यासाठी लस्सी एक थंड पर्याय आहे. आपल्या रोजच्या आहारात लस्सी घेतली पाहिजे. ते आवडत नसेल तर रोज एक वाटी दही, रायता किंवा ताक जरूर घ्या. दह्यापासून बनणाऱ्या या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला थंडावा मिळेल.

नारळ पाणी

नारळ पाणी म्हणजे जणू आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे. उन्हाळ्यात रोज नारळ पाणी पिल्याने शरीरात होणारी पाण्याची कमतरता दूर होते. एवढेच नाही तर नारळ पाणी मुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

सातूचे पीठ

उन्हाळ्यात सातू (सत्तू) खालल्याने पोट थंड राहते आणि ॲसिडीटीचा त्रास होत नाही. हरभऱ्यापासून बनलेल्या सातूमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होते.

टरबूज

उन्हाळ्यात बॉडी थंड आणि डिहायड्रेट ठेवण्यासाठी टरबूज सगळ्यात चांगला पर्याय आहे. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तसेच ते खालल्यानंतर लवकर भूक देखील लागत नाही. तसेच टरबूज मध्ये लाइकोपीन असते, जे त्वचेला उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवते.

काकडी

उन्हाळ्यात काकडी खालल्याने शरीराला थंडावा मिळतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला थंड ठेवण्यात मदत करते. याशिवाय ते शरीरातील पित्त संतुलित ठेवतो आणि शरीराचा पीएच सुद्धा योग्य ठेवतो. त्यामुळे गॅस, ॲसिडीटी आणि अपचन या सारख्या पोटाशी संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग