मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  T20 वर्ल्डकपसाठी विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम; वाचा त्याचा फिटनेस मंत्र

T20 वर्ल्डकपसाठी विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम; वाचा त्याचा फिटनेस मंत्र

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 21, 2022 10:00 AM IST

Virat Kohli Fitness Secrets : गुजरात टायटन्सविरोधातल्या सामन्यात विराट कोहलीला सूर गवसला आहे. तो फॉर्मात परतल्यानं T20 वर्ल्डकपमध्येही तो असाच खेळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. याशिवाय T20 विश्वकपला विचारात घेता फिटनेस राखायला सुरुवात केली आहे.

Virat Kohli Fitness Secrets
Virat Kohli Fitness Secrets (HT)

Cricketer Virat Kohli Diet And Workout : आयपीएलच्या या संपूर्ण हंगामात भारताचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीचा फॉर्म गायब होता. काही सामन्यांत तर तो 'गोल्डन डक' चा शिकार ठरला होता. परंतु गुजरात टायटन्सविरोधातल्या सामन्यात त्यानं कमाल केली आहे. त्यात त्यानं ७३ धावांची निर्णायक खेळी करत आरसीबीच्या विजयाचा मार्ग सुकर केला. आता आरसीबी प्लेऑफमध्ये जाणार की नाही, हे आजच्या मुंबई आणि दिल्लीतील सामन्याच्या निकालावर ठरणार आहे.

परंतु विराट कोहली नेहमीच मैदानावर अॅक्टिव आणि चपळ दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर कधीही थकवा आल्याचा भाव नसतो. क्रिकेमधील त्याच्या पदार्पणापासूनच त्यानं फिटनेस आणि डाएटवर फार लक्ष दिलेलं आहे. त्यामुळं त्याचा फिटनेस मंत्र काय आहे, जाणून घेऊयात.

विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम...

आगामी काळात T20 वर्ल्डकप लक्षात घेता विराट कोहलीनं त्यादृष्टीनं तयारी करण्यास सुरुवात केली आहे. कोहली नेहमीच जिममध्ये वर्कआऊट करण्यावर भर देत आलेला आहे. कोरोना महामारीमुळं लागलेल्या टाळेबंदीतही कोहलीनं त्याच्या घरात व्यायाम सुरू ठेवला होता. याशिवाय नेट प्रॅक्टिसच्या बाबतीही त्यानं कधीही आळस केलेला नाही. त्याच्या फिटनेसचे अनेक व्हिडिओज त्यानं ट्विटरच्या माध्यमातून शेयर केलेले आहेत.

<p>Virat Kohli Fitness</p>
Virat Kohli Fitness (HT)

मांसपेशी आणि पायांच्या व्यायामासाठी घेतो विशेष काळजी...

कोहली जीममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजही करतो, त्यामुळं त्याला धावा काढताना पळायला फारसा त्रास होत नाही. याशिवाय या व्यायामामुळे मांसपेशींना मजबूती मिळते व शरीराला वेग मिळतो, जे क्रिकेटच्या मैदानावर फार महत्त्वाचे असते.

कसा आहे विराट कोहलीचा आहार?

सातत्यानं कठोर व्यायामासह शरीराला चांगल्या आणि संतुलित आहाराचीही गरज असते, असं कोहली नेहमीच सांगत असतो. गौरव कपूरसोबतच्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या फिटनेसचा मंत्र सांगितला होता. त्यात त्यानं फॅटयुक्त पदार्थ खाणं कधीच बंद केल्याचं सांगितलं होतं. याशिवाय तो वजन मेंटेन करण्यासाठी पोहण्याचा पर्याय निवडत असल्याचं आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट वाटर बेस्ट एक्सरसाइज करण्यावर भर देत असल्याचं सांगितलं होतं.

कोहली आपल्या आहारात प्रथिनांयुक्त अन्नपदार्थ खाण्याला प्राधान्य देत आलेला आहे. त्यात हिरव्या भाज्या, पालक, अंड, बदाम, डाळ आणि डोसाच्या समावेश आहे. कोहलीला चायनीज खायला प्रचंड आवडतं, याशिवाय कॉफी आणि प्रोटीन बार त्याचं फेव्हरेट आहे, परंतु तो हेल्दी खाण्यावर भर देत असतो.

<p>Virat Kohli Fitness Tips</p>
Virat Kohli Fitness Tips (HT)

जेव्हा कोहली देशांतर्गत क्रिकेट सामने खेळायचा तेव्हा त्याला दिल्लीतील छोले भटूरे खाणं प्रचंड आवडायचं, याशिवाय त्याला गुलाबजामून खाणंही आवडतं. परंतु जेव्हा त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भारताकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा त्यानं त्याचा डाएट संपूर्णत: बदलला होता. परिणामी आज तो भारतीय संघातला सर्वात जास्त काळ फिट राहणारा बॅट्समन मानला जातो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या